शेती विषयक

इंझाळा परिसरात अवकाळी पावसासह गारपीट

Spread the love

– शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे अतोनात नुकसान

– मेघगर्जनेसह लिंबाच्या आकाराची गार, शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी

पुलगाव / प्रतिनिधी

देवळी तालुक्यातील इंझाळा यासह विविध गावांमध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस व जोरदार गारपीटीने हजेरी लावली जवळपास 15 ते 20 मिनिट बोर ते लिंबाच्या स्वरूपाची गार झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे आता तोंडाशी आलेला खास शेतकऱ्यांचा हिरावण्याच्या मार्गावर आहे.
सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास इंझाळा तळणी विजय lगोपाल चोंडी सोनोरा यासह देवळी तालुक्यातील वेगवेगळ्या भागात गारपिटीला सुरुवात झाली शेतातील गहू चना भाजीपाला तसेच फळबागेची ही अतोनात नुकसान झाले आहे. काही भागात वीस पुरवठा सुद्धा खंडित झाल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे झाडावर असलेला कापूस ओलाचिंब झाला असून शेतकऱ्याच्या डोळ्यात या झालेल्या नुकसानामुळे पाणी आले आहे. सरकारकडून मदतीची आर्त हाक शेतकऱ्यांनी दिली आहे

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close