नगर परीषद कार्यालय येथे शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाचे कचरा फेको आंदोलन
, नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी रवींद्र पाटील यांना निवेदन सादर
मोर्शी / प्रतिनिधी
*आरोग्य सेवा, शहराची स्वचछता, रस्त्याचे रखडलेले कामे असे मोर्शी करांच्या दृष्टिने महत्त्वाचे असलेले संपुर्ण मुद्दे घेवुन शिवसैनिक मोर्शी नगर परीषद कार्यालय येथे धडकले. शहरात सर्विकडे घाणीचे साम्राज्य पसरले असुन असंख्य नागरीक यामुळे त्रस्त झाले होते. वारंवार निवेदने देऊन त्यांचा पाठपुरावा करून नगर परीषद प्रशासन वाठणीवर येत नसल्याने शेवटी आज दिनांक ०८ जुलै २०२४ ला नगर परीषदेवर ‘कचरा फेको’ आंदोलन करत नगर परीषद प्रशासनाला चांगलाच घाम फोडला. आंदोलन सुरू व्हायच्या आधीच पोलीस प्रशासनाचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पेठ पुरा येथुन मोर्चाला सुरुवात करत असंख्य नागरीक या मोर्चात सहभागी झाले. पावसाळ्याच्या सुरुवातीला च आरोग्य सेवेचा बोजवारा उडाल्याचे परिणाम मोर्शी कर जनता भोगत आहेत. कचरा व्यवस्थापन करणाऱ्या कंत्राटदाराला मागील ८ महिन्यापासून देयक न दिल्याने कंत्राटदार व सफाई कर्मचाऱ्यांकडून काम बंद केले होते त्यामुळे संपुर्ण शहरात घानीने रोगराई वाढली होती, काही दिवसांआधी निसार अब्दुल कलाम या मोर्शिकर नागरिकाचा डेंग्यू मुळे मृत्यु झाला त्यामुळे संपुर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरले होते. असंख्य नागरीक याची तक्रार घेवून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे येत होते. याची दखल घेत शिवसेना तालुका प्रमुख रविंद्र गुल्हाने व युवासेना जिल्हा प्रमुख उमेश शहाणे यांनी पुढाकार घेऊन या आंदोलनाचे नेतृत्व केले.
शिवसेना सदैव जनतेच्या सेवेत या उक्ती प्रमाणे आज मोर्शी करांच्या समस्यांना तोंड फोडत पुन्हा जनसेवेची प्रचिती तालुका प्रमुख व जिल्हा प्रमुख यांचे मार्फत दिली.
या आंदोलनात सफाई कर्मचारी यांचा प्रलंबित असलेले वेतन त्यांना देय असलेली रक्कम त्यांना मिळणारा भविष्य निर्वाह निधी या सगळ्या समस्यांना यावेळी चर्चेत घेवुन सफाई कामगारांना दिलासा दिला.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख रविंद्र गुल्हाने, युवासेना जिल्हा प्रमुख उमेश शहाणे, शहर प्रमूख घनश्याम शिंगरवाडे, युवासेना शहर प्रमूख आकाश चांदे, माजी नगरसेवक प्रदिप कुऱ्हाडे, माजी नगरसेवक योगेश गणेश्वर, शिवसैनिक नरेश वानखेडे, अंकुश राजगुरे, अंकुश फंदे, अक्षय गावंडे, मनोज खंडारे, संदीप जहकार, रवी कुरील, लावकेश पवार, ओम गुल्हाने, जीवन फंदे, चंद्रकांत शिरभाते, अक्षय राजगुरे, महेंद्र भुंबर, रुपेश साऊथ तसेच असंख्य नागरीक तसेच सफाई कर्मचारी या आंदोलनात मोठया प्रमाणावर सहभागी झाले होते.*