क्राइम
चोरी केलेल्या दुचाकी बनावट कागदपत्रांच्या साह्याने विक्री करणाऱ्या गॅंग ला अटक
अमरावती / नवप्रहार मीडिया
दुचाकी ची चोरी करून आणि त्याचे बनावट कागदपत्रे तयार करून त्याची कमी किमतीत विक्री करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्या जवळून १० लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जिल्ह्यात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी चोरांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्था. गु.शा. श्री. किरण वानखडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि मोहम्मद तस्लीम शेख गफुर यांचे स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आले होते. आज दिनांक ०२/१०/२०२३ रोजी पथकातील अधिकारी व अंमलदार हे चांदुर रेल्वे उपविभागात पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गोपनिय माहिती मिळाली की, चेतन चव्हाण रा. सोनोरा भिलटेक ता. चांदुर रेल्वे व त्याचे सोबत एक इसम हे विनाकागदपत्रे असलेली बुलेट दुचाकी कमी किमतीमध्ये विक्री करीता धामणगाव रेल्वे येथे फिरत आहे.
अशा माहितीवरुन धामणगाव रेल्वे येथून गोपनिय खबरेप्रमाणे १) चेतन नरेंद्र चव्हाण वय २२ वर्ष, रा. सोनोरा भिलटेक ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती २) अनिकेत बागळे वय रा. चांदुर रेल्वे ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती यांना त्यांचे ताब्यातील रॉयल इनफिल्ड बुलेट मोटारसायकल बाबत कागदपत्राची मागणी करुन विचारपुस केली असता सदर इनफिल्ड बुलेट गाडी अमरावती शहरातील गाडगेनगर परिसरातुन रात्रीदरम्यान चोरी केल्याचे सांगीतले. वरुन नमुद दोन्ही आरोपीतांना अधिक विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे ईतर साथीदार ३) प्रतिक उर्फ चिक्या दिपक माहुरे वय अं. २३ वर्ष, रा. रामनगर, चांदुर रेल्वे ता. चांदुर रेल्वे ४) गौरव उर्फ पनोती राजु पोहोकार रा. ओम भवन जवळ, नागपुर रोड चंद्रपुर यांचे मदतीने ११ मोटारसायकली चोरी करुन विक्री केल्याची कबुली दिली. वरुन मोटारसायकली जप्त केलेल्या ग्राहकांना नमुद गुन्हयातील मुख्य आरोपी १) चेतन नरेंद्र चव्हाण वय २२ वर्ष, रा. सोनोरा भिलटेक ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती हा नागपुर येथील आरोपी नौशाद अली शौकत अली रा. टेकानाका नागपुर जि. नागपुर शहर याचेकडून बनावट आर.सी. बुक कागदपत्रे तयार करुन माझे नातेवाईक मरण पावले आहे. पैशाची अत्यंत गरज असल्याचे सांगुन मोटारसायकली काही लोकांना गहाण ठेवून तर काहींना ३० ते ३५ हजार रुपयांना विक्री केल्याचे असल्याचे निष्पन्न झाले. नमुद आरोपींनकडून अमरावती शहर येथील ५ मो.सा., अमरावती ग्रामीण १ मो.सा., नागपुर शहर ४ मो.सा., चंद्रपुर जिल्हयातील १ मो.सा. अशा एकुण ११ मोटारसायकली कि.अं. १०,०५,०००/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नमुद आरोपींना पुढील तपासकामी पोस्टे नांदगाव खंडेश्वर येथील अपराध क्रमांक २७१ / २०२३ कलम ३७९ भादंवीचे गुन्हयात ताब्यात देण्यात आले असून सदर गुन्हयाचा तपास सुरु असुन आरोपीतांनकडून आणखी मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अविनाश बारगळ सा., मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. शशिकांत सातव सा., पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, श्री. किरण वानखडे यांचे मार्गदर्शनात पो.उप.नि. मोहम्मद तस्लीम शेख गफुर श्रेणी पोउपनि मुलचंद भांबुरकर, पो.हे.कॉ. पुरुषोत्तम यादव, पो.हे.कॉ. मंगेश लकडे, पो.हे.कॉ. चंद्रशेखर खंडारे, ना.पो.कॉ. सचिन मसांगे, चालक पो.हे.कॉ. हर्षद घुसे, मंगेश मानमोठे व ना.पो.कॉ. सागर धापड सायबर सेल अमरावती ग्रा. यांनी केली. tut