गणेशोत्सवा निमित्य मोर्शी मध्ये निनादत आहे भजनाचे सूर
मोर्शी /ओंकार काळे
काळानुसार प्रत्येक क्षेत्रात बदल होत आहे. मात्र धार्मिक सण,उत्सव व या काळात घराघरात मंजुळ आवाजात येणारा भजनाचा सूर व संगीत यांची मूळ पवित्रता आजही कायम आहे. सध्या गणेशोत्सव सुरू असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा सोबतच घरोघरी गणेशाची स्थापना करण्यात आलेली आहे. त्याप्रीत्यर्थ सकाळ व संध्याकाळी करण्यात येणाऱ्या आरती सह रात्री भजनाचे स्वर सुद्धा निनादत आहे.
सबके लिए खुला है, मंदिर यह हमारा,
पालखी निघाली राजाची, या मोर्शी नगरात, लालबागचा राजा बसला नटून थाटात असे अनेक भजन,गवळण व भैरवी रात्रीला मोर्शी शहरात ऐकू येत आहे. या भजनामुळे शहरात एकप्रकारे मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील हनुमान नगर मधील राधाकृष्ण भजन मंडळा चे पदाधिकारी गणेशोत्सवात दररोज सार्वजनीक मंडळात किंवा इच्छित भाविकांच्या घरी भजन म्हणून धार्मिकता व संस्कृती जोपासत आहे.
याप्रसंगी प्रमोद राऊत, छत्रपती यावलकर, गजानन पांडे, एकनाथ जोमदे, शरद कनेर,गोपी महाजन, प्रभाकर देशमुख, करूले