सामाजिक

गणेश पर्वावर सदाबहार गितांची संगीतमय कार्यक्रम मुर्तिजापूर येथे संपन्न

Spread the love

मूर्तिजापूर / प्रतिनिधी

मुर्तिजापूर राधा मंगलम येथे तिक्ष्णगत मल्टिपर्पज वेल्फेअर सोसायटी व कलासृष्टी मल्टिपर्पज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वररधुंद म्युजिकल गृप प्रस्तुत “सदाबहार गीतो की महफील हा संगीतमय कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योगरत्न व तिक्ष्णगत मल्टिपर्पज वेल्फेअर सोसायटी संस्थापक अध्यक्ष मा. डॉ सुगतजी वाघमारे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तिक्ष्णगतचे सचिव विष्णूदास मोंडोकार, विशाल शिंदे , वंचितचे सामाजिक कार्यकर्ते भैय्यासाहेब तायडे, प्रा.व्ही आर कांबळे, होते तर उपस्थितीमध्ये मराठा सेवा संघाचे पदाधिकारी गजानन बोर्डे व प्रा.प्रमोद ठाकरे, साहित्यिक रविंद्र जवादे, साहित्यीक प्रमोद पंत,समाज सेवक विष्णू लोडम, गझलकार बाळू बेलखेडे,अनिल डाहेलकर,कवी सुनील डोंगरदीवे, प्रविण नागपुरे, ,लता डोंगरे, रंजना विनायक डोंगरदीवे, प्रतुल विरघट, अक्षय सिरसाठ, निखिल किर्दक,हर्षदा डोंगरे, बॉबी पळसपगार, बाळू गवई, सुनील डाबेराव, कवियत्री सिमाताई कांबळे, कवी डी के कांबळे, शैलेश गुप्ता, राहुल फुईके हे उपस्थित होते,
सर्वप्रथम पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तिक्ष्णगतचे संस्थापक अध्यक्ष मा. डॉ. सुगतजी वाघमारे यांच्या “दिल को देखो चेहरा ना देखो,इस चेहरे ने लाखो को लुटा” या गीताने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
त्यांनी आपल्या गीतातून प्रेक्षकांना महत्वपूर्ण संदेश दिला. सामाजिक क्षेत्रात अनेक चेहरे सामाजिक कार्य करताना समाज सेवक किंवा कार्यकर्ते दिसतील परंतु सामाजिक कार्य करत असताना, स्वच्छ हृदयाचे व मोठे मनाचे पुढारी जन्माला येतात तेव्हाच देशाचं कल्याण होवू शकते. त्यामुळे अशाच स्वच्छ मनाच्या माणसाप्रती प्रामाणिक रहा असे आवाहन केले.
नंतर सदाबहार गितांच्या कार्यक्रमामध्ये
सादरीकरण कल्पक कांबळे, मिलिंद इंगळे, करण गवई, गौतम इंगळे, सुरेंद्र धंदर, संघमित्रा कांबळे, मनिषा तायडे व पर्वणी नितनवरे. ह्यांनी एकसे बढकर एक एकल व युगल गीत सादर करून प्रेक्षकांना शेवट पर्यंत खिळवून ठेवले. त्यामध्ये मिलिंद इंगळे यांचे फुल फुल पे बनी तेरी तस्वीर व जो गीत नहीं जन्मा या गीताला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. चंद्रा ही लावणी संघमित्रा कल्पक कांबळे अदाकारी झाले, तर मनिषा तायडे व सुरेंद्र धंदर यांनी “जरासा झुमलू मैं” ह्या गिताने प्रसन्न केले, “इश्क औऱ प्यार का” या गीताने कल्पक कांबळे यांनी अल्ताफ राजाची आठवण करून दिली, सध्या परिचित असलेल्या गदर चित्रपटाचे “मैं निकला गड्डी लेके” हे गीत करण गौतम इंगळे ह्यांनी दमदार आवाजात प्रस्तूत केले व ” कितना प्यारा तुझे रब ने बनाया” हे युगल गीत पर्वणी नितनवरे व सुरेंद्र धंदर व करण गवई यांनी “हवा हवा ए हवा” या गीताने प्रेक्षकांच्या मनाला जिंकले. हा कार्यक्रमाचे बहारदार संचालन संजय शिंदे तर आभार मिलिंद इंगळे यांनी मानले या कार्यक्रमाचे दिग्दर्शन कलासृष्टी चे संस्थापक अध्यक्ष कल्पक कांबळे यांनी केले.
………………………………..

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close