गांधी जिंदे है,उनको मरनच नही* — गाडगेबाबा *वसुंधरा इंग्लिश हायस्कूल येथे म.गांधी-हुतात्मा दिन संपन्न
आकोट : स्थानिक वसुंधरा इंग्लिश हायस्कूल येथे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त हुतात्मा दिन संपन्न झाला.याप्रसंगी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात हौतात्म्य पत्करणार्या शहिद भगतसिंग,चंद्रशेखर आझाद,नेताजी सुभाषचंद्र बोस इत्यादींचे स्मरण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी संस्थापक अध्यक्ष विठ्ठल कुलट यांनी
गाडगेबाबांच्या अखेरच्या कीर्तनातील विचारांना उजाळा दिला.गाडगेबाबा लोकांना उद्देशून म्हणाले,’ब्रिटिश सरकारनं आपल्यावर एक संकट आणलं होतं.गुलामीचं संकट.मंग त्यासाठी सत्याग्रह कोनं केला?,मालुम हाये काय?’
‘हो..हो..महात्मा गांधीजीनं…’
म्हनुन गांधीजीले देव म्हना. गांधीजीच्या नावानं देवाचा गजर करा.बोला गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला…! लोकोहो,जबतलक उपर सुरज,चांद है.तबतलक धरतीपर गांधी जिंदे है. गांधीजीकु मरनच नही.मरनेवाले आनेवाले जानेवाले हम है.’
यावेळी महाकुंभ मेळ्यातील
चेंगराचेंगरीत ठार झालेल्या भाविकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.या दु:खद प्रसंगाबद्दल बोलताना विठ्ठल कुलट यांनी याच कीर्तनातील गाडगेबाबांचे विचार मांडले-
‘तुकोबा म्हनतत् “मी खूप फिरलो.मले शीन आला.पन देव दिसला नाही.मंग दिसलं काय? दगडाचा देव अन गंगेचं पानी… !” दगडाचा देव अन गंगेच्या पान्याचं तीर्थ याची जोळी बसली.कबीर पुरावा देतत्….” जञामे फञा बिठाया तीरथ बनाया पानी | दुनिया भई दिवानी पैसे की धुलधानी…!” भटजीची एक लयन हाये.तांब्याभर पान्याचे पंधरा रुपय.चमचाभर तीरथाचे दोनाने.तीरथाले जानं देवाचा संबंध नाही.पैस्याचा नास अन खानाखराबा हाये…..!’ यावेळी संस्थेचे सचिव वसंतराव पुंडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्याध्यापक शिवचरण नारे यांनी प्रास्ताविक,संचालन संजय वाकडे तर आभार प्रशांत वाघ यांनी मानले.कार्यक्रमास
शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी,
पालक-विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.