क्राइम

दोन वेगवेगळ्या घटनेत मुलींनी सहकाऱ्याच्या मदतीने आईला संपवले

Spread the love

पनवेल  / खालापूर / नवप्रहार डेस्क

                     मुली आईच्या अत्यंत जवळ असतात . प्रत्येक लहानसहान गोष्टी मुली आईसोबत शेअर करत असतात असे म्हटल्या जाते. पण दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनेत मुलींनीच सहकाऱ्यांच्या मदतीने आईला यमसदनी धाडल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. पहिली घटना रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात घडली आहे. आईने मुलीला प्रियकरा सोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्याने मुलगी आणि तिच्या प्रियकराने मिळून तिचा खून केला आहे. तर दुसऱ्या घटनेत घरगुती वादातून मुलीने आईला संपवले आहे.

घटना क्रं १ –

खालापूर (रायगड) येथील परखंदे अहिल्यानगर गावात घडली आहे.संगीता मारुती झोरे असे मयत महिलेचे नाव आहे.

मयत संगीता या आपल्या दोन मुलींसह परखंदे अहिल्यानगर गावात राहत होत्या. मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास संगीता यांना झोपेतून जाग आली. यावेळी संगीता यांना त्यांची मोठी मुलगी भारती ही तिचा प्रियकर संतोष नांदगावकर याच्यासोबत नको त्या अवस्थेत दिसली.

संगीता यांनी आरडाओरडा करण्यास सुरवात केली. यावेळी संतोषने त्यांचे तोंड दाबून त्यांना जमिनीवर खाली पाडले. त्यानंतर संगीताच्या तोंडावर घरातील ब्लँकेट दाबून धरले. तर भारतीने आईचे पाय पकडले. श्वास कोंडल्याने संगीता यांचा मृत्यू झाला.

संगीता यांची हत्या झाल्याचे लपवण्यासाठी आरोपींनी साडीने घराच्या छताच्या लोखंडी पाईपला मृतदेह लटकवला. तसेच पायाजवळ लाकडी स्टूल ठेवून हत्येला आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न केला.

घटना घडली तेव्हा संगीता यांची लहान मुलगीही तेथे उपस्थित होती. लहान मुलीने सर्व घडला प्रकार नातेवाईकांना सांगितला. यानंतर ही हत्येची घटना उघडकीस आली.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार खालापूर पोलीस ठाण्यात भारती झोरे आणि तिचा प्रियकर संतोष नांदगावकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. अधिक तपास खालापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार करत आहेत.

घटना क्रं २

घरगुती वादाचा राग मनात धरून पोटच्या मुलीने आपल्या आईचा खून केल्याचा प्रकार पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. याप्रकरणी मुलीसह दोघा संशयितांना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली असून याबाबत अधिक चौकशी सुरू आहे.

प्रिया नाईक (वय ४४) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

पनवेल शहरातील मणीकनगर सोसायटीमध्ये प्रिया नाईक आपल्या कुटुंबासोबत राहत होत्या. शुक्रवारी (दि.१३) प्रिया यांचा मृतदेह त्याच्या राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. यादरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असता प्रथमदर्शी प्रिया नाईक यांचा दोरी किंवा वायरने गळा आवळून खून केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पनवेल शहर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी कसून तपास सुरू केला. तपास करताना काही धागेदोरे हाती लागल्याने पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले त्यानंतर त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हाची कबुली दिली. तसेच यामध्ये खून झालेल्या महिलेच्या मुलीचा देखील सहभाग असून घरगुती वादातून हा खून करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर मुलीलाही पोलिसांनी अटक केली असून तिची चौकशी सुरू आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close