शासनाने तेली समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे – गणेश पवार
तेली सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त
तेली समाज संघटन मेळावा व तेली नारी शक्ती स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
(छत्रपती संभाजीनगर)/ प्रतिनिधी
तेली समाज हा कष्टकरी व स्वाभिमानी समाज आहे या समाजाचे अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित असून ते सोडून घेण्यासाठी सर्वांनी संघटित होणे गरजेचे आहे.
तेली सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त तिळवण तेली समाज भवन किराणा चावडी शहागंज येथे तेली समाज संघटन मेळावा व तेली नारी शक्ती स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना गणेश पवार म्हणाले की शासनाने तेली समाजाच्या मागण्यांकडे लक्ष देऊन समाजाला न्याय द्यावा तेली समाज हा महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणात विखुरलेला आहे या समाजातील 80 टक्के समाज बांधव मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत आहे.
तेली समाजासाठी स्वतंत्रपणे आर्थिक विकास मंडळ स्थापन करणे गरजेचे आहे.
तेली सेनेची स्थापनाच सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झाली आहे तेली सेनेच्या माध्यमातून आम्ही समाजाच्या प्रश्नांवर लढत राहु
असेही तेली सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार म्हणाले.
सदरील कार्यक्रमात ह.भ.प.देविदास महाराज संचालीत संतश्री जगनाडे महाराज अनाथालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले व तेली सेनेच्या वतीने सातत्याने वर्षभर अनेक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
आप आपल्या माध्यमातून सामाजिक कार्याला मदत करणाऱ्या समाज बांधवांना शक्ती केंद्र प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अनेक पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रही देण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात संतश्री जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.ह.भ.प.प्रभाकर बोरसे, ह.भ.प.देविदास मिसाळ, ह.भ.प.सोमनाथ कर्डिले,ह.भ.प.संगिता काजळे,तिळवण तेली समाज भवनचे अध्यक्ष रमेश क्षीरसागर,समाज सेवक श्री.नारायण दळवे,लक्ष्मी महाकाळ,नम्रता देवे,डॉ मीनल क्षीरसागर यांनी उपस्थित समाजाला मार्गदर्शन केले.
प्रमुख उपस्थित म्हणून जेष्ठ पत्रकार स.सो.खंडळकर,महेंद्र महाकाळ,रत्न दळवे,नारायण दळवे,ज्ञानेश्वर सोनवणे, राजेश शिंदे,भगवान राऊत,रामेश्वर मालोदे,योगेश मिसाळ,जगदीश नांदरकर,राजेंद्र होळीवाळे,दत्त राऊत,सुनिता सोनवणे,शरदा तेली,अंजली मिसाळ,जयश्री कोरडे,आदींची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तेली सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी केले तर सुत्रसंचालन सौ.धनश्री आंबेकर यांनी केले व
आभार प्रदर्शन जिल्हा अध्यक्ष श्रीराम कोरडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनिल क्षीरसागर,गणेश वाडेकर,श्रीराम कोरडे,दत्त भोलाने,राजू मगर,संतोष गायकवाड,भिकन राऊत,संतोष सुरूळे,योगेश शेलार,गायत्री चौधरी,अर्चना फिरके,रंजना बागूल,ज्योती पतके,सुनिता पवार,साक्षी पवार,आदींनी परिश्रम घेतले.