AI च्या मदतीने तब्बल 19 वर्षानंतर तिहेरी हत्या प्रकरणातील आरोपी गजाआड
पद्दुचेरी / नवप्रहार ब्युरो
विज्ञानाच्या प्रगतीमुळे तिहेरी हत्याकांडातील आरोपींन शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. कोल्लम इथल्या अलायमोन येथे रंजिनी च्या शेजारी दिविल राहत होता. त्या दोघात प्रेम होतं. दरम्यान रंजिनी गर्भवती राहिली. तिने दोन मुलांना जन्म दिला. 10 फेब्रुवारी 2006 रोजी रंजिनी व्ही आई संथम्मा कोल्लम इथल्या आंचलमधल्या पंचायत कार्यालयातून घरी परतली. तिला घरात मुलगी रंजिनी आणि तिच्या 17 दिवसांच्या जुळ्या मुली रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसलं. त्यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. तिने लगेच पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तपास सुरू केला. या हत्येमागे सैन्यातल्या दोन जवानांचा हात असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं. दिविल कुमार आणि राजेश हे दोघं तेव्हा पंजाबमधल्या पठाणकोट लष्करी तळावर तैनात होते. पोलीस त्यांना अटक करू न शकल्याने प्रकरण थंडावलं.या प्रकरणी सीबीआयने दोन आरोपींना अटक केली आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
19 वर्षांनंतर सीबीआयने त्यांना 4 जानेवारीला पुद्दुचेरी इथे अटक केली. हे दोघंही ओळख बदलून कुटुंबीयांसोबत राहत होते. दोघांचा विवाह झाला होता. त्यांना मुलंदेखील होती. दिविल कुमार (42) हा विष्णू म्हणून, तर राजेश (48) हा प्रवीण कुमार या नावाने पत्नी आणि मुलांसोबत राहत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्लम इथल्या अलायमोनमध्ये शेजारी राहणाऱ्या रंजिनीशी दिविलचं अफेअर होतं. दरम्यान, रंजिनी गर्भवती राहिली. त्यामुळे दिविल तिच्यापासून दूर राहू लागला. मग तो ब्रेकअप करून पठाणकोटला निघून गेला.
2006 मध्ये जानेवारी महिन्याच्या अखेरीस रंजिनीने तिरुवनंतपुरम इथल्या एका रुग्णालयात जुळ्या मुलींना जन्म दिला. कन्नूर इथल्या श्रीकंदापुरम इथल्या रहिवासी असलेल्या राजेशने अनिल कुमार असं नाव सांगून रंजिनीशी मैत्री केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश आणि दिविल हे दोघंही सैन्यात सह कर्मचारी होते आणि रंजिनीच्या हत्येत त्या दोघांचा सहभाग होता. दिविल आणि राजेश त्या वर्षी जानेवारीत सुट्टीवर होते. या दरम्यान, रंजिनीने राज्य महिला आयोगाकडून एक आदेश मिळवला. दिविलला लष्करी तळावरून परत बोलवावे आणि मुलींचा पिता असल्याचं सिद्ध करण्यासाठी त्याची डीएनए चाचणी करावी, असं या आदेशात नमूद होतं.
पोलिसांनी सांगितलं, की राजेशने रंजिनीला ‘तू अविवाहित माता असल्याने तुला समाज स्वीकारणार नाही,’ असं सांगितलं. मग त्याने तिला भाडेतत्त्वावर घर घेऊन दिलं. हा देखील दिविल आणि राजेशचा प्लॅन होता.
रंजिनीची आई संथम्माने सांगितलं की, मैत्री करण्याच्या हेतूने तो जाणूनबुजून रुग्णालयात रंजिनीजवळ फिरत होता. आम्हाला त्याचा हेतू समजला नाही. पोलिसांनी अनिल कुमारच्या भूमिकेबाबत तपास सुरू केला असता, त्याच्या नावावर टू व्हिलरचं नोंदणीपत्र मिळालं. यावरून राजेश आणि दिविलचा पर्दाफाश झाला. कारण यात राजेशने या पत्रावर पठाणकोट लष्करी तळाचा पत्ता दिला होता. दिविलचं पोस्टिंग तिथेच होतं. यावरून हत्येसाठी दिविलला राजेशने मदत केल्याचं स्पष्ट झालं. हे दोघं अटकेपूर्वी फरार झाले होते. त्यानंतर 2010मध्ये केरळ उच्च न्यायालयाने संथाम्माच्या याचिकेवर कारवाई करून हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं होतं.
AI च्या मदतीने असे तयार केले फोटो
केरळचे एडीजीपी (कायदा व सुव्यवस्था) मनोज अब्राहम यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना सांगितलं, की तंत्रज्ञान गुप्तचर विभागाने आरोपींचा माग काढण्यासाठी एआयचा वापर केला. आरोपी 19 वर्षांनंतर कसे दिसतील हे पाहण्यासाठी त्यांची जुनी छायाचित्रं तयार केली . एआयचा वापर करून अनेक पर्याय वापरून पाहिले गेले. सोशल मीडियावर उपलब्ध छायाचित्रांशी ही छायाचित्रं जुळवली गेली. एका आरोपीचं एआय छायाचित्र फेसबुकवर शेअर केलेल्या विवाहातल्या छायाचित्राशी 90 टक्के जुळलं. आम्ही पुढचा तपास करून राजेशचा पुद्दुचेरीपर्यंत माग काढला. त्यामुळे आम्ही दिविलपर्यंत पोहोचू शकलो. सीबीआयकडे प्रकरण असल्याने आम्ही त्यांच्या चेन्नई युनिटला सतर्क केलं. या युनिटने त्या दोघांना अटक केली.