क्राइम

सोशल मीडियावर झालेली मैत्री नवरा बायकोच्या नात्यावर पडली भारी

Spread the love

प्रियकर आणि मैत्रिणीच्या मदतीने बायकोने नवऱ्याचा केला खून

रायगड / प्रतिनिधी

                      सोशल मीडियावर तरुणासोबत झालेल्या मैत्रीत महिला इतकी वेडीपिसी झाली की प्रेम संबंधात अडसर ठरत असलेल्या नवऱ्याचा तिने प्रियकर आणि मैंत्रिणीच्या साह्याने कायमचा काटा काढला. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. .

अधिकची माहिती अशी की, मृतकाचे नाव कृष्णा नामदेव खंडवी (वय 23) असून, तो पाबळ तालुका, पेण येथील रहिवासी होता. त्याच्या पत्नीने उमेश सदु महाकाळ या व्यक्तीच्या आणि सुप्रिया चौधरी या मैत्रिणीच्या साहाय्याने त्याला ठार करण्याचा कट रचला. या घटनेनंतर नागोठाणे पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तपासात समोर आले आहे की, दिपाली अशोक निरगुडे आणि उमेश यांच्यात विवाहबाह्य संबंध होते. या नात्यामुळे पती कृष्णा अडचणीत पडत असल्याचे त्यांनी ठरवले. त्यामुळे त्यांनी कृष्णाला कायमचा दूर करण्याचा निर्णय घेतला आणि सुप्रिया चौधरीच्या मदतीने खून करण्याची योजना आखली.

सुप्रिया चौधरीने हत्येच्या तयारीसाठी सोशल मीडियावर बनावट खातं तयार केले आणि त्यातून कृष्णाशी संपर्क साधला. काही काळ मैत्री आणि प्रेमाचे गाठी बांधून कृष्णाला जाळ्यात फसवण्यात आलं. त्यानंतर सुप्रियाने कृष्णाला पेण येथून नागोठणे येथील वरसगावच्या डोंगराळ भागात बोलावले. तिथे त्याला निर्जन ठिकाणी नेऊन खून केला. मृतदेहाची ओळख लपवण्यासाठी केमिकलचा वापर केला गेला, तर मोबाईल फोडून जाळ्यात फेकण्यात आला. सध्या या प्रकरणात तिघांनाही पोलीसांनी ताब्यात घेतले आहे, तर नागोठणे पोलीस या हत्येच्या घटनेचा सखोल तपास सुरू ठेवत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close