सोशल मीडियावरील मैत्री , लव्ह आणि …..

ग्वाल्हेर / नवप्रहार न्यूज नेटवर्क
सोशल मीडिया हे सध्या तरुणाईसाठी जीव की प्राण बनले आहे.तरुणाईला अँड्रॉइड मोबाईल शिवाय जगणे अशक्य झाले आहे. लोकांची लाईफ लाईन बनत असलेला हा मोबाईल त्यांच्या फसवणुकीसाठी सुद्धा कारणीभूत बनत असल्याचे अनेक प्रकरणावरून समोर येत आहे. फसवणूक मग ती आर्थिक किंवा व्यक्तिगत कोणतीही असू शकते.
सोशल मीडियावर होत असलेल्या फसवणुकीच्या प्रकरणात आणखी एक भर पडली आहे. प्रकरण मध्य प्रदेश च्या ग्वाल्हेरमधील सत्यनारायण येथील टेकरी घोसीपुरामधील आहे.येथील एका 20 वर्षीय तरुणीची अनिकेत जाटवं नावाच्या तरुणा सोबत fesbook वर मैत्री झाली. दोघांची पहिली भेट ही ग्वाल्हेर बस स्टँडवर होते. या भेटीनंतर दोघांची चांगली मैत्री झाली, रोज एकमेकांसोबत बोलू लागले. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं हीच संधी साधत त्याने तिला लग्नाचं आमिष दिलं.
एक दिवस आरोपीने त्याच्या मित्राच्या घरी बोलावलं आणि प्रेम व्यक्त करू लागला. लग्न करण्यासाठी तयार असल्याचं सांगत त्याने तिला विश्वासात घेतलं. एकांताचा फायदा घेत शरीर संबंध ठेवले. पीडितेने त्याच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवला होता. त्यानंतर जवळपास दोघे लिव्ह इनमध्ये राहिले. लिव्ह इनमध्ये राहिल्यावर त्याने अनेकवेळा तिच्यासोबत शरीर संबंध ठेवत आपली हवस पूर्ण केली.
दोघे भाड्याने खोली घेऊन राहत होते, प्रेमात आंधळी झालेली 20 वर्षीय पीडित आपलं घर सोडून आली होती. दोघे पती पत्नीसारखे राहिले मात्र पीडित जेव्हाही लग्नाबाबत बोलायची तेव्हा तो बोलणं बंद करायचा. काही दिवसांनी आरोपीची एंगेजमेंट होणार होती. यासंदर्भात पीडितेला माहिती झाल्यावर तिने लग्नासाठी दबाव टाकला. मात्र अनिकेतने तेव्हा त्याचं खरं रूप दाखवलं.
एंगेजमेंट तुटली तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकीच त्याने दिली. त्यानंतर पीडितेने पोलीस स्टेशन गाठलं आणि फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली. पोलीस आरोपीचा शोध घेत असून लवकरच त्याला ताब्यात घेणार असल्याचं एएसपी गजेंद्र वर्धमान यांनी सांगितलं. ही घटना मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेरमधील सत्यनारायण येथील टेकरी घोसीपुरामधील आहे.