राजकिय

राणाच्या त्या वक्तव्याबर मित्रपक्ष नाराज 

Spread the love

बोलण्यामुळे यांची बायको पडली – दादा 

शिंदे आणि अजित पवार नाराज 

मुंबई / नवप्रहार डेस्क

                 रवी राणा आपल्या बेताल वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. नुकतेच त्यांनी एक भाष्य केल्याने मुख्यमंत्री शिंदे आणि अजित दादा कमालीचे नाराज झाले असल्याचे बोलल्या जात आहे. अजित पवार यांनी तर त्यांना फडणवीस यांनी समज द्यावी असे म्हटले आहे. तर यांच्या बोलण्यामुळेच यांच्या बायकोचा पराभव झाला असे देखील म्हटले आहे.

महायुतीतील मित्रपक्षांनी राणा यांच्या विधानाची दखल घेतलेली असून मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या विधानावर संताप व्यक्त केला तर रवी राणा यांना फडणवीसांनी समज द्यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

अमरावतीत एखादी जागा कमी झाली तरी चालेल पण जिल्ह्यात कमळ फुलले पाहिजे, असे म्हणत रवी राणा यांनी आपले पारंपारिक विरोधक संजय खोडके आणि अभिजीत अडसूळ यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. खोडके, अडसूळ आणि राणा तिघेही महायुतीचे घटक आहेत. तरीही रवी राणा यांनी आपल्या कार्यकर्त्यांना विरोधात काम करण्याचे संकेत दिले. राणा यांच्या विधानाची मित्रपक्षांनी लगोलग दखल घेतली.

महायुतीत मिठाचा खडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रवी राणा यांना सुनावले

महायुतीचे सगळे व्यवस्थित चाललेले आहे. कुणीही मिठाचा खडा टाकू नये. रवी राणा आणि नवनीत राणा यांनाही मी सांगतो, तुम्ही महायुतीचे घटक आहात. महायुतीचे सरकार तुमच्यामागे खंबीरपणे उभा आहे. हे सरकार दुसऱ्यांदा आणण्यासाठी कॅप्टन अभिजीत अडसूळही आपल्याला हवे आहेत. महायुतीची शिस्त पाळली पाहिजे. महायुतीत राहायचे आणि विरोधात काम करायचे, हे बरोबर नाही.

ह्याच्या बोलण्यामुळे त्याच्या बायकोचा लोकसभेला पराभव झाला, अजितदादा यांचा निशाणा

रवी राणा यांच्यावर न बोललेलं बरं… रवी राणा यांचे विधान म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी… ह्याच्या बोलण्यामुळे त्याच्या बायकोचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला… अशा शब्दात अजित पवार यांनी रवी राणा यांच्यावर निशाणा साधला. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी रवी राणा यांना समज द्यावी, असेही अजित पवार म्हणाले. लोक काहीबाही बोलत असतात. सगळ्यांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया देत बसायचं नसतं, असा सल्लाही अजित पवार यांनी रवी राणा यांना दिला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close