प्रोफेसर महिलेचा विद्यार्थ्यावर आला जीव , ट्रीप दरम्यान ठेवले शारीरिक सबंध

मग केला बलात्काराचा आरोप : कोर्टाने या गोष्टीकडे वेधले लक्ष
नवी दिल्ली / नवप्रहारं मीडिया
पूर्वी गुरू आणि शिष्यात एक आदरयुक्त नाते होते. गुरू समोरून येताना जरी दिसला तरी शिष्य कुठेतरी लपायचा.थोडक्यात सांगायचे झाल्यास शिक्षकांचा आदरयुक्त दरारा होता. पण जसजसा काळं उलटत गेला आणि शिष्य व गुरुजनानी पाश्चात्य संस्कृती आत्मसात केली त्यानंतर मात्र गुरू आणि शीष्यात प्रेम प्रकरण सर्रास घडायला लागले . काही प्रकरणात पुरुष शिक्षकाने विद्यार्थिनीला प्रेम जाळ्यात ओढून तिचे शारीरिक शोषण केले तर काही प्रकरणात महिला शिक्षिकेने विद्यार्थ्याचे शोषण केले. हे प्रकरण देखील महिला प्रोफेसर आणि विद्यार्थ्यांत झालेल्या प्रेम प्रकरणाचे आहे.
प्रकरण असे आहे की, इथे एक 35 वर्षीय महिला प्रोफेसर 20 वर्षीय विद्यार्थ्याच्या प्रेमात पडली. त्यानंतर ते एकत्र ट्रिपला गेले.त्या दरम्यान त्यांच्यात शारीरिक संबंध निर्माण झाले. ट्रीपदरम्यान दोघांनी एका मंदिरात लग्नही केले. पण, त्यानंतर आता महिला प्रोफेसरने विद्यार्थ्यावर बलात्काराचा आरोप केला. महिला प्रोफेसरने सांगितले की, ती दोनदा गरोदर राहिली पण तिला गर्भपात करण्यास सांगण्यात आले. या प्रकरणाची सुनावणी झाली तेव्हा न्यायालयाने काय म्हटले हे तुम्ही नक्की जाणून घ्या…
या गोष्टीकडे दुर्लक्ष करता येणार नाही
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, न्यायालयाने सांगितले की, दोघांमध्ये गुरु आणि शिष्याचे नाते आहे. न्यायमूर्ती सौरभ बॅनर्जी यांनी टिप्पणी केली की, पीडित महिला पीएचडी पदवीधर आहे, याकडेही न्यायालय दुर्लक्ष करु शकत नाही. ती उच्चशिक्षित आहे. ती गुरुग्राममधील एका मोठ्या विद्यापीठात प्रोफेसर म्हणून काम करते. ती बऱ्यापैकी समजदार आहे. मात्र ज्या व्यक्तीवर बलात्काराचा आरोप आहे तो त्या विद्यापीठात शिकणारा विद्यार्थी आहे.
मनालीच्या ट्रीपमध्ये काय झालं?
एफआयआरनुसार, पीडितेने सांगितले की, ती फेब्रुवारी 2022 मध्ये कॉलेजमध्येच विद्यार्थ्याला भेटली होती. त्यावेळी ती प्रोफेसर होती आणि आरोपी विद्यार्थी होता. आरोपानुसार, त्याच वर्षी मे महिन्यात ते मनालीला ट्रीपला गेले होते, तेव्हा तिथल्या एका छोट्या मंदिरात दोघांनी लग्न केले. भविष्यात तो तिच्याशी कायदेशीर विवाह करेल, असे वचन मुलाने दिले होते.
मुलाने गर्भपात करण्यास का सांगितले?
पीडितेच्या एफआयआरनुसार, विद्यार्थ्याने नंतर तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. यावर्षी एप्रिल आणि जून महिन्यात ती दोनदा गर्भवती राहिल्याचा दावाही पीडितेने केला. त्यानंतर पीडितेने न्यायालयात सांगितले की, ती आरोपीच्या कुटुंबालाही भेटली होती, मात्र तिला गर्भपात करण्यास सांगण्यात आले होते.
अपघाताने काहीही झाले नाही
पीडित महिला मॅच्युअर महिला आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही असे न्यायालयाने म्हटले आहे. विद्यार्थ्याशी रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर ती काय करणार आहे हे तिला चांगलेच माहीत होते. तर आरोपी 20 वर्षांचा मुलगा होता जो तिच्यापेक्षा कमी समजदार होता. एवढ्या लहान वयाच्या मुलाशी संबंध ठेवल्याने होणारे परिणाम तिला माहीत नव्हते, असे होऊच शकत नाही. ती सुमारे एक वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिली. न्यायालयाने असेही म्हटले की, पीडिता विद्यार्थ्याबरोबर तिच्या स्वत:च्या इच्छेने रिलेशनशिप होती. याशिवाय न्यायालयाने उशिरा आलेल्या एफआयआरवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.