स्व. अस्मिता उमेश यावलकर यांच्या स्मुती प्रित्यर्थ निशुल्क नेत्र तपासणी शिबीर
शिबिराला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद.
३,१२२ नागरिकांनी केली तपासणी.
वरूड/तूषार अकर्ते
मंगळवार दि.४ जुलै ला वरूड शहरातील माजी नगरसेवक उमेश उर्फ चंदू यावलकर यांच्या निवासस्थानी स्व.अस्मिता उमेश यावलकर यांचा स्मृती प्रित्यर्थ निशुल्क नेत्र तपासणी, मोतीयाबिंदू ऑपरेशन व औषधी वाटप शिबिर नुकतेच पार पडले आहे.
या शिबिरामध्ये एकुन ३,१२२ नागरिकांनी आपली नेत्र तपासणी केली असुन ६०३ गरजू व गोरगरीब लोकांचा डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करण्याचे शिबिराला उपस्थित डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. तर ७६३ लोकांना या वेळी चस्मे वाटप करण्यात आले आहे.तर काही लोकांना औषधी वाटप करण्यात आल्या आहे.या शिबिराचे आयोजन चंदु यावलकर यांच्या कडून निशुल्क करण्यात आले आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात पार पडलेल्या यशस्वी शिबिराचे कारण तपासणीकरिता आलेल्या नागरिकांना विचारण्यात आले तेव्हा चंदु यावलकर यांच्यावर असलेला आमचा विश्वास असे सांगण्यात आले आहे.