Uncategorized

चार तरुणांचा शारीरिक आणि मानसिक त्रास विद्यार्थिनीने  संपवले जीवन 

Spread the love

यापैकी एकाने बहिणीसमोरच केला होता तिच्यावर बलात्कार

या घटनेचे अश्लील चित्रीकरण करून वारंवार शरीर सुखाची मागणी करून देत होता त्रास 

सांगली / नवप्रहार ब्युरो

              १० व्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने चार सहपाठी विद्यार्थ्यांच्या त्रासाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली आहे. हे चार तरुण तिला शारीरिक सुखाची मागणी करून त्रास देत होते. यातील एकाने तर तिच्यावर तिच्या बहिणी समोरच बलात्कार केला होता. आणि त्याचे चित्रीकरण करून तिला ब्लॅकमेल करत होता. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील ही धक्कादायक घटना आहे .

धक्कादायक म्हणजे या चौघातील एकाने त्या विद्यार्थिनीवर तिच्या बहिणीच्या समोरच बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. तर होणाऱ्या त्राला कंटाळून तिने आज पहाटे आपली जीवन यात्रा संपली. यामुळे संतप्त झालेल्या संतप्त ग्रामस्थांनी एकाला बेदम चोप दिल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, आटपाडी तालुक्यातील एका गावात दहावीत शिकणाऱ्या सोळा वर्षीय विद्यार्थिनीला गावातील चार तरूण त्रास देत होते. तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात होता. तर तिच्याकडे शरीर सुखाच्या मागणी गेली जात होती. याच त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे यातील एकाने तिच्यावर बहिणीच्या समोरच बलात्कार केला होता. या प्रकरणी चौघावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी दोघांना अटक केलीय.

दरम्यान यातील एकाला संतप्त ग्रामस्थांनी बेदम चोप दिल्याने त्याच्यावर सांगलीत उपचार सुरू आहेत. दोघे पसार असून त्यांचा शोध पोलिस घेत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळत निषेध नोंदवला असून पोलिसांच्या भूमिकेबाबतही ग्रामस्थांनी रोष व्यक्त करत दिवसभर पोलीस ठाण्यासमोर तळ ठोकला होता.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित मुलगी तालुक्यातील एका गावात कुटुंबासोबत शेतात राहत होती. ती गावातच माध्यमिक शाळेत दहावीमध्ये शिकत होती. पण गेल्या काही दिवसांपासून शाळेला येता आणि जाता राजू गेंड, रामदास गायकवाड, रोहित खरात (सर्व रा. करगणी) आणि अनिल नाना काळे (रा. बनपुरी) हे तिचा पाठलाग करत होते.

तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देत होते. तसेच घरच्या मोबाईलवर फोन करून त्रास दिला जात होता. त्यामुळे ती अस्वस्थ होती. यातील राजू गेंड हा तिच्यावर दबाव टाकून शरीर सुखाची मागणी करत होता. ती तीने अनेकदा धुडकावली होती. त्यानंतर राजू गेंड याने जबरदस्तीने तिला गावातील एका खोलीवर नेत बलात्कार केला होता. धक्कादायक म्हणजे हा अत्याचार तिच्या बहिणीच्या समोरच झाला करण्यात आला. तसेच या घटनेचा व्हिडिओही बनवला होता. त्याचाच वापर करून तो तिला भीती दाखवत होता.

याच भीतीमुळे ती तणावाखाली वावरत होती. या तरूणांचा त्रास वाढत चालल्याने रविवारी (ता.7) रात्री तिने जेवताना पालकांना सारी कहाणी सांगितली. त्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे ठरले होते. पण आता तक्रार देण्याच्याआधीच तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळाला पोलीस निरीक्षक विनय बहिर आणि पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी राजू गेंड, रामदास गायकवाड, रोहित खरात आणि अनिल नाना काळे यांच्यावर आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोघे पसार

पीडित मुलीने आत्महत्या केल्यानंतर प्रथमदर्शनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला होता. पण आता लैंगिक अत्याचारासह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यातील दोघे पसार असून एकाला अटक केली आहे.

एकाला बेदम चोप

पीडित मुलीच्या आत्महत्येनंतर ग्रामस्थांच्या संतापाचा उद्रेक झाला. या प्रकरणातील रामदास गायकवाड याला ग्रामस्थांनी बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्यावर सांगली येथे उपचार सुरू आहेत. तर मुख्यआरोपी राजू गेंड याला अटक केली असून त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close