सामाजिक

चार मजली इमारत पत्त्या सारखी कोसळली 

Spread the love

शिमला / नवप्रहार वृत्तसेवा 

                डोंगराळ भागात वरच्या बाजूने खोदकाम करण्यात आल्याने एक चार मजली इमारत भूस्खलनामुळे पत्त्या सारखी कोसळली. घटना हिमाचल ची राजधानी असलेल्या शिमला येथील धामी परिसरातील मराहवाग गावात घडली. घटना शनिवारी रात्री 12 वा. घडली. या इमारतीत वसतिगृह होते.पण इमारत घटनेपूर्वीच खाली केल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही.

असं सांगितलं जातं की ही इमारत विधी विद्यापीठाचे बहुमजली वसतिगृह होतं. जे भुस्खलनामुळे पत्यांसारखं कोसळलं. वसतिगृहाला तडे गेल्याने आठवडाभरापूर्वीच ते रिकामे करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यामुळे कोणतीही जिवीतहानी झाली नाही.परंतू यामुळे सरकारी महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचे नुकसान झाले आणि वाहतुकीवर परिणाम झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ही घटना मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास मराहवाग गावात 16 मैल येथे घडली. राज कुमार यांच्या मालकीचे हे घर मोडणारं होते आणि इमारतीच्या पायाभूत स्तंभांना भेगा पडल्या होत्या, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. संभाव्य हानी टाळण्यासाठी, कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी टाळण्यासाठी इमारत आगाऊ रिकामी करण्यात आली असं देखील त्यांनी सांगितलं.

इमारत कोसळल्याने धामी येथील शासकीय पदवी महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचे अंशत: नुकसान झाले, परिणामी वाहतूक विस्कळीत झाली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. निशांत, उपविभागीय दंडाधिकारी (ग्रामीण) यांनी सांगितले की, घराच्या वरच्या डोंगराळ भागात खोदकाम केल्यामुळे इमारत कोसळली असल्याचं त्यांनी सांगितलं

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close