३२ वर्षांनी वडझिरे च्या जनसेवा विदयालयाचे माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र .
पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील यांजकडून ] -1992 मध्ये दहावीच्या वर्गात एकत्रित शिकणारे पारनेर तालुक्यातील जनसेवा विद्यालयाचे माजी विद्यार्थी तब्बल 32 वर्षांनी स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने नगर येथील फणसवाडी च्या फणसवाडी रिसॉर्ट मध्ये एकत्रित भेटले व बेधुंद गप्पा आणि नाच गाण्यांच्या धुंदीत देहभान विसरून गेले .
तब्बल 32 वर्षांनी झालेल्या या स्नेह मेळावा चे आयोजन करण्यासाठी गेले आठ महिन्यापासून सर्व मित्र मैत्रिणी ” दिल दोस्ती दुनियादारी ” हा व्हाट्सअप ग्रुप गेल्या तीन वर्षापूर्वी स्थापन केला . त्याच्या माध्यमातून झालेल्या या ग्रुपच्या माध्यमातून आठ महिन्यापासून सातत्याने मित्रांनी एकत्रित प्रयत्न करून हा स्नेह मेळावा अतिशय थाटात संपन्न केला . या साठी इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत 1992 साला पर्यंत जनसेवा विदयालयात शिक्षण घेत असलेले सर्वच माजी विद्यार्थी एकत्र येत नगर चेहरा जवळील फणसवाडी येथील फणसवाडी रिसॉर्ट मध्ये सकाळी ११ वाजता जमा झाले . त्यासाठी कोणी टू व्हीलर वर , कोणी फोर व्हीलर घेऊन, तर कोणी शाळेच्या बसने येथे एकत्रित जमा झाले . यावेळी 1992 साठी दहावी मध्ये इंग्रजी विषय शिकवणारे पवार सर, हिंदी विषय शिकवणारे हांडे सर हेही गुरुपौर्णिमेनिमित्त या स्नेह मेळाव्यासाठी उपस्थित राहिल्याने या मेळाव्याला खूपच रंगत आली . सर्वप्रथम सर्व माजी विद्यार्थ्यांना गुलाबी फेटे बांधून खिशाला ” दिल दोस्ती दुनियादारी “, या ग्रुपचा बॅच लावून स्वागत करण्यात आले . प्रत्यक्षात स्नेही मेळावा सकाळी अकरा वाजता चहा नाश्ता करून सुरू झाला .यावेळी सर्वप्रथम शिक्षक पवार सर व हांडे सर यांचे सोनेरी फेटा बांधून व गुलाब पुष्प देऊन प्रवेशद्वारातच स्वागत करण्यात आले. यावेळी शिक्षक पवार सर व हांडे सर यांनी मनोगत व्यक्त करताना 32 वर्षांपूर्वीचे शैक्षणिक कामकाजाबद्दल माहिती देवून आजच्या या स्नेह मेळाव्या बद्दल आनंद व्यक्त केला व सन्माना बद्दल ऋण व्यक्त केले .आपण त्यावेळी विद्यार्थ्यांना घालून दिलेल्या शैक्षणिक चाकोरी तून हे सर्व माजी विद्यार्थी जीवनात वाटचाल करत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले .तद्नंतर सभा मंचकावर त्यांचे सन्मान चिन्ह , शाल , श्रीफळ, पुष्पगुच्छ व एक एक पेन देऊन स्वागत करण्यात आले .
यावेळी प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापले नाव, गाव, व्यवसाय , शालेय जीवनातील गमती ,जमती व अनुभव कथन केले . दुपारी तीन वाजेपर्यंत पहिल्या सत्रात अशा पद्धतीने मेळाव्याला मजा आली , नंतर स्नेहभोजन करण्यात आले व उपस्थित शिक्षकांना सन्मानाने निरोप देण्यात आला .पुन्हा चार वाजता उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांना एक एक सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले .त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणी सांगून गप्पागोष्टी केल्या . तर साऊंड बॉक्स वरती साग्र संगीत लावून त्यावर सर्वांनी ठेका धरून नाचण्याचा आनंद घेतला . पुन्हा लवकरच भेटण्याचा व घरी गेल्यानंतर एकमेकाला मोबाईल द्वारे सुखरूप पोहोचल्या चा संदेश करण्याच्या आणा भाका घेण्यात आल्या .
सर्वांच्या सहभागाने हा स्नेहमेळावा अतिशय थाटामाटात संपन्न झाला .या स्नेह मेळावाचे सूत्रसंचालन शिक्षण विस्तार अधिकारी विनेश लाळगे यांनी केले .या मेळाव्यासाठी वडझिरे इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य जयसिंग लंके, उद्योजक शंकर तोडकर , अभिनेता नाना मोरे , शिक्षक सतीश परांडे , संभाजी एरंडे , मोहन खोसे , मॅनेजर संजय पोटे , महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हा सचिव सुरेश खोसे पाटील, बाळासाहेब मोरे, राजेंद्र पानसरे , प्रसिद्ध गायक विलास अटक , संतोष शिंदे , विश्वनाथ शिंदे , जालिंदर बोरकर , विलास बेलोटे , संतोष बेलोटे , वाहक पोपट करकंडे , ज्ञानेश्वर श्रीमंदीलकर , ज्ञानेश्वर कोरडे , विनोद करकंडे , कृष्णा खोसे , राजेंद्र पिंपरकर , संजय झंझाड ,भारती खोसे, संगीता जाधव, विद्या पटवा , शैला खणकर , वर्षा रोकडे , अलका कांजवणे, सुनिता बोरूडे , संगिता ढवळे , आणि इतर माजी विद्यार्थी उपस्थित होते . यासाठी पारनेर तालुक्या बरोबरच पुणे , नगर , मुंबई व इतरत्र ठिकाणावरून हे माजी विद्यार्थी व विद्यार्थींनी सहभागी झाले होते .
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील पत्रकारां ची संवाद यात्रा नागपूर येथील दीक्षाभूमी ते मुंबईतील मंत्रालयापर्यंत निघणार आहे .या संवाद यात्रेला पाठिंबा देण्यात येवून , शुभेच्छा ही देण्यात आल्या . या संवाद यात्रेचा पोस्टरच्या प्रकाशन ही उपस्थित सेवानिवृत्त शिक्षक पवार सर व हांडे सर आणि माजी विद्यार्थी यांच्या वतीने करण्यात आले . ]