शाशकीय

बोगस डिग्री असल्याच्या स्वशःयावरुन दहीगाव रेचा येथील डाँक्टरचा दवाखाना सील

Spread the love

 


चार दिवसांत योग्य प्रमाणपत्र सादर करण्याचे तालुका आरोग्य अधिकारी डोंगरे यांचे निर्देश

 रुग्णांच्या जीवाशी खेळ होत असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणने

अंजनगाव सुर्जी / मनोहर मुरकुटे

अंजनगाव सुर्जी तालुक्यात बोगस डॉक्टर संबंधी सर्वञ चर्चा सुरु असतांना, दुसऱ्याचे डिग्रीवर सेवा देण्याचे काम हा डॉक्टर करत असल्याचा स्वंशय तालूका वैद्यकीय अधिकारी यांना आल्यानंतर, तालूका वैद्यकीय व्यावसायिक समीती व तालूका वैद्यकीय अधिकारी डाँ.सुधीर डोंगरे यांनी दहीगाव रेचा येथील त्या डाँ.च्या दवाखान्याला सील लावून चार दिवसात प्रमाण पत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहे.
सविस्तर माहितीनुसार अंजनगाव सुर्जी तालुक्यात बोगस डॉक्टर संबंधी खाजगी वैद्यकीय व्यावसायिक दवाखाना पडताळणी समिती तर्फे चौकशी करतांना तालुका आरोग्य अधिकारी यांना दहिगाव रेचा येथील एका डॉक्टर ला त्यांची डिग्री विचारली असता त्या डॉक्टर ने व्हॉट्स ॲप वर डिग्रीचा फ़ोटो पाठवला व उलट उलटा चोर कोतवाल को डाटे , ह्या म्हनिप्रमाणे डॉ. डोंगरे ह्यांनाच तुम्हाला पाहून घेईल अशी भाषा वापरली .दिलेल्या प्रमाणित प्रमाणपत्रावर संशय आढळल्याने डॉ.सुधीर डोंगरे तालुका वैद्यकीय अधिकारी, रोहन पुनसे औषध निर्माण अधिकारी, बीट जमदार सांगोळे, पोलीस पाटील कमलाकर उके, ग्रामपंचायत ग्राम समिती तर्फे कर्मचारी मनोहर डोंगरे ही मंडळी दहिगाव रेचा येथील दवाखान्यात पडताळणी साठी भेट दिली असता डॉक्टर त्यांच्या क्लिनिक ठिकाणी हजर नसल्याने त्या डॉक्टर ला चार दिवसात शासनाला योग्य प्रमाणीत प्रमाणपत्र पडताळणी करीता सादर करण्याचे नोटीस द्वारे निर्देशित केले.तसे न केल्यास प्रशासना तर्फे कायदेशीर कार्यवाही करण्याचे पत्र दवाखान्याचेj दरवाज्यावर लावन्यात आले आहे
**************************
त्या संशयीत डॉक्टर ची तालुका वैद्यकीय अधिकारी यांनाच धमकी

चार दिवसापूर्वी डॉ डोंगरे यांनी त्या संशयीत डॉक्टर कडे फोन द्वारे चौकशी केली असता तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर डोंगरे यांना धमकावत तुमचे ओळखपत्र दाखवा नाहीतर तुमच्या विरुद्ध पोलीसला तक्रार करणार परंतु डॉ सुधीर डोंगरे यांनी ही आपले कर्तव्य बजावत त्यांना ओळखपत्र दाखवले परंतु तरीही त्या संशयीत डॉक्टर ने पुन्हा धमकावत माझा भाऊ तुम्हाला पाहून घेईल अशा अर्वाच्य भाषेत बोलत असल्याचे डॉ. सुधीर डोंगरे यांनी घडलेला प्रकार प्रसार माध्यमांना सांगितला.

आमची खाजगी वैद्यकीय व्यावसायिक दवाखाना पडताळणी चालु असताना दहिगाव रेचा येथील संशयीत डॉक्टर ह्यांचे डीग्री विषयी संशय आल्याने मी तालुका व ग्रामीण पडताळणी समिती तर्फे त्यांच्या दवाखान्यात गेलो असता डॉक्टर त्यांच्या दवाखान्यात हजर नसल्याने त्यांना चार दिवसात शासनाला प्रमाणीत प्रमाणपत्र पडताळणी करीता सादर करण्याचे नोटीस द्वारे निर्देशित केले आहे.
पडताळणी नंतर किंवा त्यांनी प्रमाणपत्र सादर न केल्यास प्रशासना तर्फे कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
तसेच प्रशासनाला धमकवल्या मुळे प्रशासन आपले कर्तव्य विसरणार नसुन जे सत्य आहे ते त्यांची डिग्री पडताळणी नंतर समोर येईल.
डॉ. सुधीर डोंगरे
तालुका वैद्यकीय अधिकारी अंजनगाव सुर्जी.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close