माजी आमदार राजू तोडसाम यांची ५०० कार्यकर्ते सोबत बी आर एस आंध्र पक्षात एन्ट्री
घाटंजी तालुका प्रतिनीधी- सचिन कर्णेवार
घाटंजी बाळकृष्ण मंगलम येथे झालेल्या ‘अबकी बार किसान सरकार’ म्हणत बी आर एस पक्ष प्रवेश व विद्यमान ग्रामपंचायत सरपंच व सदस्य सत्कार कार्यक्रमाचे मोठ्या थाटात आयोजन झाले. यवतमाळ जिल्हा आर्णी विधानसभा माजी आमदार राजु तोडसाम यांणी नुक्ताच आपल्या राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकला असुन त्यांचा मा. आंध्र मुख्यमंत्री भेटी नंतर बी आर एस वाट धरली त्यामुळे त्यांचे सोबतची असंख्य कार्यकर्ते ही त्यांच्या पावलावर पाऊल टाकत त्या वाटेवर पक्षप्रवेष झाला यामुळ् राजकिय वर्तूळात हलबली झाली असुन आंध्र मागाऊन झालेले राज्य असुनही जणतेच्या शेतक-याच्या हीताच्या योजना राबवतात शेतकरी मोफत विज देतात, पेरणीला आधी १०,००० रु देतात ईकडे महाराष्ट्र मात्र १ रु घेऊन शेतीविमा काढावा लागतो व ऑनलाईन चे नावावर शेतकरी पायरीवर चपल्ला झिझऊनही विमा मिळत नाही.आंध्र सरकार सरसकट घरकुल दीले जाते तर महाराष्ट्र सरकार मात्र घरकुल मंजुरातीत विलंब त लावतेच शिवाय आधी घराचा खड्डा दाखवा, मंग भिंती दाखवा करत करत घरकुल लाभार्थी कागद जोडता जोडता बेजार होते हे आपल्या अध्यक्ष भाषणातुन उपस्थितात पटऊन दीले. आपले नेते काम कमी बाता ज्यास्त करतात शिवाय काम करणा-याची ‘तिकीट कापली जाते! हे मत त्यांणी माडले. कवपर्यंत मालक मालक करुन सतरंजी ऊचलायची. जणतेच्या हीतासाठी आपण हे पक्ष बदल पाऊल उचलले असल्यामुळे आपल्या सोबतीला सक्रीय कार्यक्ते आहे येत्या काळात परिवर्तण करुच हे मत मांडले. ५०० कार्यकर्ते यावेळी बी आर एस पक्षात प्रवेश केला हे विशेष.