सामाजिक
वृक्ष दिना निमित्त वन विभागा कडून वृक्ष दिंडी
◆ शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित
◆सामाजिक महिलांनी वृक्ष देऊन केला मुख्याध्यापकाचा सत्कार
नेर :- नवनाथ दरोई
वृक्ष दिनाच्या औचित्य साधून वन विभागातर्फे झाडे लावा यासाठी यवतमाळ अमरावती महामार्गावरून वृक्ष दिंडी काढण्यात आली. या दिंडीत नेर तालुक्यातील अनेक दिंड्याचा समावेश दिसून येत होता. दिंडीच्या माध्यमातून जनतेने झाडे लावावे असा संदेश दिंडीकरी देत होते. यावेळी सामाजिक महिलांनी ईलीग्न्ंट हायस्कूलचे मुख्याध्यापक शाकीर यांना आवळ्याचे रोपटे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार करते वेळी शोभा कोठारी, विना खोडवे, रेणुका जयस्वाल, रूपाली शिंदे,अर्चना वासनिक, सुविधा केवटे या महिलांनी शाळेच्या परिसरात वटवृक्षाच्या रोपट्याची लागवड केली. दिंडीमध्ये वन विभागासह नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार व कर्मचारी उपस्थित होते.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1