सावरखेड पिंगळाई नजिक वन विभागाचे जंगलात पती-पत्नीची सामूहिक गळफास घेऊन आत्महत्या
चार दिवसापासून होते बेपत्ता.
मोर्शी / प्रतिनिधी
मोर्शी तालुक्यातील चार दिवसापासून लिहिदा येथून बेपत्ता असलेले पती-पत्नी सावरखेड पिंगळाई नजीक वन विभागाचे जंगलात गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आत्महत्या केल्याची घटना घडली शिरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत ग्राम लिहिदा येतील पती-पत्नी पती अमोल रामदास साबळे वय 35 वर्षे पत्नी राणी अमोल साबळे वय 27 वर्षे यांनी सावरखेड पिंगळाई येथील वन विभागाच्या जंगलात गळफास घेऊन आत्महत्या केली सदर पति पत्नी हे दिनांक 9 ऑगस्ट पासून बेपत्ता होते असे मृतकाचे नातेवाईकांनी सांगितले मृतक राणी साबळे यांचे माहेर जोलवाडी तालुका आष्टी जिल्हा वर्धा येथील रवींद्र गोविंदराव दाभाडे यांची मुलगी असून चार वर्षा आधी लिहिदा येतील अमोल साबळे सोबत लग्न झाले होते त्यानंतर त्यांना चार वर्षाची एक मुलगी आहे सदर घटनेचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी निलेश पांडे ठाणेदार सचिन लुले साहेब यांचे मार्गदर्शनाखाली ए स आय किसन धुर्वे जमादार संजय वाघमारे कॉन्स्टेबल वैभव घोगरे पोलीस कॉस्टेबल लवंनकर पोलीस कॉस्टबल मेटकर पोलीस कॉस्टेबल गोपाल काईंदे यांनी घटनेचा तपास केला असून सदर पेताला पीएम करिता मोर्शी येथे पाठविण्यात आले घटने संदर्भात आत्महत्या का केली अज्ञात असून पुढील तपास शिरखेड पोलीस करत आहे. मृतक दोघेही पती पत्नी स्वतःची जुपिटर कंपनीची गाडी MH27 CJ 9102 घेऊन आले असावे असा पोलिसांचा अंदाज असून ही गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली.