क्राइम

अवैध रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीतांविरूद्ध कारवाई वाहनासह एकुण ३६३०००० /- रूपयाचा मुद्देमाल जप्त

Spread the love

 

नागपुर प्रतिनिधी अमित वानखडे
दिनांक १२/०७/२०२३ रोजी पोलीस स्टेशन उमरेड येथील स्टाफ हा शासकीय वाहनाने पोस्टे उमरेड हद्दीमध्ये पेट्रोलिंग व अवैध रेती वाहतुक करणाऱ्यांवर कारवाई करणेकामी दिनांक १२/०७/२०२३ रोजी सकाळी ०७.३० वा. ते ०८.३० वा. दरम्यान पेट्रोलिंग करत असतांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहिती मिळाली की, काही ट्रकमध्ये अवैधरीत्या रेतीची चोरटी वाहतुक होत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस स्टेशन उमरेड येथील स्टाफ यांनी मोहपा फाटा उमरेड येथे नाकाबंदी करीत असतांना १) ट्रक क्र. एम. एच. – ४० / सी.डी. – ७३२४ किंमती अंदाजे २०,००,००० /- रू मध्ये ०५ ब्रॉस रेतीची किंमती अंदाजे १५,०००/- रू. असा एकूण २०,१५,०००/- रू २) ट्रक क्र. एम. एच. ४९/ ए.टी. ८०१२ किंमती अंदाजे १६,००,००० /- रू. मध्ये ०५ ब्रॉस रेती किंमती अंदाजे १५,०००/- रू. असा एकूण १६,१५,०००/- रू. चा मुद्देमाल मालकाचे सांगण्यावरून सामदा नदीच्या पात्रातून शासनाच्या गौण खनिजाचे उत्खनन करून अवैधरित्या विना परवाना चोरटी वाहतुक करतांना मिळून आल्याने आरोपी नामे- १) अक्षय मनोहर आत्राम, वय २३ वर्ष, रा. उटी ता. उमरेड २) दिपक मारेश्वर बमलोटे, रा. वाठोडा नागपूर ३) मोहम्मद नयूम खान ईदुल खान, वय २४ वर्ष, रा. गरीब नमाज चौक खरबी नागपूर ४) मो. ईस्राईल खान अकबर खान, रा. गरीब नमाज चौक, खरबी नागपूर यांच्या ताब्यातून १० ब्रास रेती किमती अंदाजे ३०,०००/- रू. असा एकुण वाहनासह ३६३०००० /- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी नामे- पोलीस नायक राधेश्याम कांबळे, पोस्टे उमरेड यांचे रीपोर्टवरून पोलीस स्टेशन उमरेड येथे आरोपीतांविरूद्ध कलम ३७९, १०९ भादंवि अन्वये गुन्हा नोंद केला असुन गुन्हयाचा पुढील तपास पोस्टे उमरेड करीत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close