इंटरनेटची मदत घेत सुनेने कुटुंबातील पाच लोकांना संपवलं
गडचिरोली / नवप्रहार मीडिया
प्रेमविवाह केल्यानंतर सासरच्या लोकांकडून छळ होत असल्याने मामे सासूला सोबत घेऊन सुनेने सासरच्या पाच लोकांना अन्नात विष देऊन मारल्याचा धक्कादायक आणि क्लेशदायक प्रकार समोर आलं आहे. पोलिसांनी सखोल तपस करून आरोपींना अटक केली आहे. संघमित्रा कुंभारे आणि रोझा रामटेके अशी आरोपींची नावे आहेत.
त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहिती नुसार संघमित्रा हीने रोशन कुंभारे याच्या सोबत कुटुंबाचा विरोध पत्करून प्रेमविवाह केला होता. त्यामुळे असंगमित्राच्या वडिलांनी आत्महत्या केली होती. विवाहानंतर पतीसह सासरच्यांकडून संघमित्राचा छळ केला जात होता. यामुळेच तिने काटा काढायचं ठरवलं. तर दुसरी आरोपी रोझा रामटेके ही संघमित्राची मामेसासू आहे. रोशनची आई विजया कुंभारे आणि तिच्या इतर बहिणी या रोझाच्या वडिलांच्या संपत्तीत वाटणी मागत होत्या. त्यावरून नेहमी वाद होत असतं. यातूनच संघमित्रा आणि रोझा यांनी मम्ळून पाच जणांना मारण्याचा कट रचला..
सुरवातीला धोत्रा वनस्पतींचा केला उपयोग पण —– संघमित्रा आणि रोझा यांनी सुरुवातीला धोतरा या विषारी वनस्पतीचा वापर करून विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला. मात्र धोतऱ्याचा वापर केल्यास अन्न आणि पाण्याचा रंग बदलत असल्याचं त्यांना समजलं. यानंतर दोघींनी इंटरनेटची मदत घेत विषाबद्दल माहिती मिळवली. त्यांनी रंग, चव न बदलणारे विष शोधले. तसंच हे विष शरिरात गेल्यानंतर चार ते पाच दिवसांनी याचा परिणाम होतो असंही त्यांना समजलं.
तेलंगणातून आणले विष —-
रोझाने तेलंगणा राज्यातून विष आणले. जेव्हा संधी मिळेल तेव्हा जेवणात हे विष मिसळले. संघमित्राचे सासू सासरे सुरुवातीला आजारी पडले. दोघेही २६ आणि २७ सप्टेंबर रोजी मृत्यूमुखी पडले. तर संघमित्राची नणंद कोमल दहागावकरचा ८ ऑक्टोबरला मृत्यू झाला. मावशी आनंदा उंदीरवाडे यांचा १४ ऑक्टोबरला आणि संघमित्राचा पती रोशन कुंभारेचा १५ ऑक्टोबरला मृत्यू झाला. सध्या आणखी तिघांवर उपचार सुरू आहेत. यात रोशनच्या आई वडिलांना दवाखान्यात नेणारा वाहनचालक राकेश मडावी, रोशनचा मावसभाऊ बंटी आणि रोशनचा भाऊ राहुल यांच्यावर उपचार सुरू आहेत.