येनगाव येथील जलादेवी माता देवस्थान येथील लाडल्या बहिणींचा देवाभाऊ कार्यक्रम मधील सर्व लाडक्या बहिणी सुरक्षित”….
भाजपा नेते – सुमित वानखेडे.
यनगाव येथील जलादेवी माता मंदिरातील “लाडक्या बहिणीचा देवाभाऊ” कार्यक्रम हा कधीही न विसरता येणारा होता. जवळ जवळ ५०० माता-भगिनी या कार्यक्रमाला आलेल्या होत्या. मी कार्यक्रम स्थळी पोहोचेपर्यंत इतका प्रचंड प्रमाणात पाऊस झाला की, कार्यक्रम ज्या मंदिरात होता ते पूर्णपणे पाण्याने वेढल्या गेले. मंदिराकडे जाणाऱ्या पुलावरून प्रचंड पाणी वाहत होते. पुलाच्या एका टोकावर मी चिंताग्रस्त तर पलीकडे लाडक्या बहिणी पूर ओसरायची वाट पाहत होत्या. शेवटी आई जलादेवी प्रसन्न झाली. सहा तासांच्या तणावपूर्ण प्रतीक्षेनंतर पाणी ओसरायला लागले.यावेळी उपविभागीय अधिकारी शिरसाट साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी खंडागळे साहेब, तहसीलदार गिरी मॅडम स्वतः जातीने लक्ष देऊन होते. सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि यांनी जी मेहनत घेतली त्याबद्दल आभार. आई जलादेवी आपल्या भक्तांचे कधी वाईट होऊ देत नाही त्याच्या प्रत्यय आजच्या दिवशी आला..