सामाजिक

सामनेर व अनागारिका धम्म प्रशिक्षण तर्फे पाच दिवसीय शिबिर

Spread the love

डॉ. बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षणाचे आयोजन .

चांदुर रेल्वे – ( ता.प्र.) प्रकाश रंगारी

चांदुर रेल्वे – आपल्या जीवनाचे ध्येय हे सुख नसून, सत्य असायला हवे. जगाला युद्ध नको बुद्ध पाहिजे. जगात दुःख आहे आणि त्याचे निवारण बुद्ध विचार मार्गाने करता येते. म्हणून बुद्धाच्या धम्माचा प्रचार व प्रसार हवा याकरिता, डॉ.बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियानाच्या माध्यमातून सामनेर व अनागारिका असे पाच दिवसीय धम्म शिबिराचे आयोजन अंजन सिंगी येथे करण्यात आहे.
बुधवार दिनांक 22 मे ते 26 मे 2024 पर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर लुंबिनी बुद्ध विहार येथे हे शिबिर होणार आहे. बुधवार दिनांक 22 मे रोजी दुपारी 4:00 वाजता उद्घाटन होणार असून, या पाच दिवशी शिबिराचे धम्म प्रशिक्षक म्हणून पूज्य भंते तीस्स महाथेरो, औरंगाबाद यांच्या हस्ते सामनेर धम्मदीक्षा विधी होणार आहे. तर पूज्य भन्ते राहुल थावीर भिक्खू संघ जिल्हाध्यक्ष यवतमाळ. पूज्य भन्ते, धम्म सेन अमरावती. पूज्य भन्ते चंद्रमणी ग्वालियर हे उपस्थित राहणार आहे. यावेळी उद्घाटक पाहुणे म्हणून मा. प्राध्यापक इंदुताई नारनवरे पाली अभ्यासक नागपूर, डॉ. प्रा.प्रवीणजी राऊत, आंबेडकर विचारवंत नागपूर. शाऊबाई रामचंद्र कांबळे, विशाखा बहुउद्देशीय समिती अध्यक्ष शशिकला नामदेवराव दवाळे, रमाबाई महिला मंडळ अध्यक्ष. रूपाली गायकवाड सरपंच अंजनसिंगी तर भारतीय बौद्ध महासभा चे राहुलजी गायकवाड, कैलासभाऊ ठाकरे, शिलानंद झांमरे, भगवान चंदनखेडे हे राहणार आहे.
या शिबिराचा लाभ घेण्याकरिता आयोजक बंडूभाऊ आठवले, जिल्हाध्यक्ष अमरावती, नितीन टाले अमरावती जिल्हा संघटक. मृदुलता हेरोडे जिल्हा उपप्रमुख अमरावती, या शिबिराचा लाभ घेण्याकरिता समस्त जनतेला आयोजकाकडून आव्हान करण्यात आले आहे.

 शिबिरामध्ये येताना सर्व धम्मरक्षकांना या शिबिराचे नियम व अटीचे पालन करावे लागेल.
असे आव्हान आयोजकाकडून करण्यात आले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close