वैद्यकीय क्षेत्रातील प्रथम वर्षाला असणाऱ्या विद्यार्थिनीने घेतला गळफास.
अरविंद वानखडे
यवतमाळ –
येथील वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षाला शिक्षण घेत असलेल्या कु.सुहानी ढोले १९ वर्षे विद्यार्थिनीने हॉस्टेल च्या स्वतःच्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना मध्यरात्रीच्या दरम्यान घडली असावी अशी शंका वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश जतकर यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान ही आत्महत्येचे कारण अद्याप कोणतीही निश्चित माहिती उपलब्ध झालेली नाही.
मा.वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात तीन महिन्यापूर्वीच प्रवेश घेतलेल्या उस्मानाबाद जिल्हातील धाराशिव येथील विद्यार्थिनी मेडिकल कॉलेज मध्ये शिकणारी सुहानी ढोले या विद्यार्थिनींनी आत्महत्या केली. क्रिसमस च्या
दोन ते तीन दिवस सुट्टी आल्याने तिच्या रूम मधील वर्ग मैत्रिणी या गावी गेल्या असल्याने रूममध्ये एकटीच होती. नाताळच्या दिवशी मृतक सुहानी या विद्यार्थिनीने मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत खरेदी केली. आणि काल रात्रीच्या दरम्यान तिने आत्महत्या केली.
सुहानी इचे वडील शिक्षक असून ती अतिशय बुद्धिवान विद्यार्थिनी होती. भारतातील १६ लाख विद्यार्थ्यांपैकी तीस हजार क्रमांकाच्या रँक होती.आणि तिची ऍडमिशन ऑल इंडिया रँक मधून खुल्या प्रवर्गात झाली असल्याचेही सांगण्यात आले.दहावी आणि बारावी मध्ये देखील ती आऊट ऑफ होती. त्यामुळे तिला अभ्यासा मध्ये अत्यंत हुष्यार असल्याने शिक्षणाचे टेन्शन नसल्याचे प्रथम दर्शनी लक्षात येते व कुठल्या तणावाखाली तिने आत्महत्या केली. याबाबत कुठलीही माहिती उपलब्ध होऊ शकत नाही. मात्र तिने मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली असल्याची चर्चा नागरिकांकडून होत आहे. वैद्यकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये रॅगिंग हा प्रकार सुद्धा नियमित घडत असून असा काहीसा प्रकार घडला की काय अशी सुद्धा चर्चा नागरिकांमधून होत आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतली आहे. त्यात काय नमूद केले याबद्दलचा उलगडा सध्या होऊ शकलेला नाही.
यासंदर्भात वैद्यकीय पथकाने मैत्रिणीकडे विचारणा केली असता त्यांनीही ती कधीही टेन्शनमध्ये दिसत नसल्याची माहिती दिली.मात्र नियमित अभ्यासात करीत असल्याने एकटीच राहत असून जास्त वावर तिचा मैत्रीच राहत नसायची मात्र याची कारण तिने कधी मैत्रिणीकडे व्यक्त केले नाही. अशी माहिती पुढे आली आहे. पुढील तपास शहर पोलीस स्टेशन करीत आहे.