गांधी विचार संस्कार परीक्षेत शिवाजी विद्यालयातील कोळपे आदित्य जिल्ह्यात प्रथम
प्रतिनिधी:
कोपरगाव तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय मौजे सुरेगाव कोळपेवाडी येथे सन 2022-23 मध्ये झालेल्या गांधी विचार संस्कार परीक्षेत विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे.
या परीक्षेसाठी विद्यालयातून एकूण ५२२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यामध्ये विद्यालयातील कोळपे आदित्य हा विद्यार्थी अहमदनगर जिल्ह्यात प्रथम येऊन सुवर्णपदकाचा मानकरी ठरला, तसेच माळी प्रतिभा ही भाग शाळेची विद्यार्थिनी जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवून सिल्वर मेडलची मानकरी ठरली ,व शेख अमन हा भागशाळेचा विद्यार्थी जिल्ह्यात तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण होऊन कांस्यपदकाचा मानकरी ठरला, तसेच विद्यालयासाठी सन्मानचिन्ह प्राप्त झाले आहे.या मिळालेल्या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य शप्रकाश चौरे,उपप्राचार्य अंगद काकडे,पर्यवेक्षक लक्ष्मण कुदळे तसेच स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष व सदस्य यांनी अभिनंदन केले आहे.या परीक्षेच्या विभाग प्रमुख म्हणून श्रीमती चौधरी सुरेखा यांनी काम पाहिले.