क्राइम

कोंढवा परिसरात गोळीबार, एकाचा मृत्यू; गँगवार मधून खून झाल्याची शक्यता

Spread the love

पुणे / विशेष प्रतिनिधी

               एकेकाळी शिक्षण नगरी म्हणून राज्यात नावलौकिक असलेले पुणे शहर मागील काही दिवसांपासून क्राइम शहर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. अन्य मोठ्या शहरांप्रमाणे येथे क्राईम रेट जबरदस्त वाढला आहे. येथे गँगवार सुद्धा पाहायला मिळत आहे. नुकताच कोंढवा परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा गोळीबार गँगवार मधून झाल्याचा पोलिसांचा कयास आहे.  मृत तरुणाचे नाव गणेश काळे असे असून, तो कोंढवा परिसरात राहणारा आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, गणेश काळे शनिवारी दुपारी आपल्या कामानिमित्त घराबाहेर पडला होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्याला अडवून पिस्तुलातून सलग गोळ्या झाडल्या. या गोळीबारात काळे गंभीर जखमी झाला.

घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि काळेला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

घटनास्थळावरून पोलिसांनी काही महत्त्वाचे पुरावे जप्त केले असून, हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. गणेश काळे हा यापूर्वी झालेल्या एका खून प्रकरणातील आरोपीचा भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या खुनामागे टोळीयुद्धाची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला नाना पेठेत झालेल्या टोळीयुद्धात आंदेकर टोळीने आयुष कोमकरवर गोळीबार केला होता, त्यात आयुषचा जागीच मृत्यू झाला होता.

या घटनेनंतर नीलेश घायवळ टोळीतील सराईतांनी कोथरूडमधील शास्त्रीनगर परिसरात आणखी एका तरुणावर गोळीबार केला होता. तसेच त्याच परिसरात एका तरुणावर कोयत्याने वार करून दहशत निर्माण करण्यात आली होती.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close