अखेर मुर्लीचा पाणी प्रश्न सरपंच उज्वला आत्राम यांनी लावला मार्गी
घाटंजी तालुका प्रतिनिधी- सचिन कर्णेवार
घाटंजी जवळ अवघ्या दोन की मी अंतर असलेला मुर्ली ग्राम पंच्यायत महिला सरपंच उज्वला पुडलिक आत्राम यांनी ग्रा.प. सदस्य व गावातील लोकांशी संवाद साधून पाण्याच्या टाकी साठी जागा मुर्ली येथिल राहिवाशी अनंतराव चौधरी यांच्या कडे विनंती करून त्यांच्या शेतातील जागा मुर्लीत पाण्याची समस्या दूर व्हावी या करिता मागीतली.एका महिला सरपंच गावासाठीची धडपड पाऊण अनंतराव चौधरी यांनी जागा दान दिली. त्यांचे औदार्यच व पष्ट मत ‘दान द्याल्या खूप इस्टेट लागत नाही केवळ 3 एक्कर जमीन मधून पाण्याच्या टाकीला लागणारी जागा देण्यात आली या प्रसंगी माजी सरपंच विष्णू कोवे, सुरेश बेले ,पुडलिक आत्राम, सुनील मडावी,रामदास आत्राम राजू मडावी, अरविंद चौधरी, अमोल अनंतराव चौधरी यांच्या समोर जागा देऊन दोन वर्षा पासून प्रलंबित असलेला प्रश्न सरपंच व गावातील मंडळी याच्या समोर त्यांनी शब्द दिला आणी जागा पन दिली. गावासाठीची पाणीसमस्या मार्गी लागावी ही भावणा यावेळी सरपंच उज्वला ताई आत्राम यांनी आपल्या भावणारूपी बोलण्यातुन व्यक्त केली तसेच भूदान कर्ते यांचे मुलगा अमोल चौधरी यांचे आभार मानले.गावातील सर्व गरीब जनतेला या पेयजल योजने अंतर्गत मिळणारे पाणी तुमच्या मुळे मिळेल आशा शब्दात माजी सरपंच विष्णू कोवे यांनी पाण्याच्या टाकीच्या उद्घाटन प्रसंगी बोलतांणा आभार मानले. या वेळी मुर्ली गावातील मंडळी उपस्तित होती.