शाशकीय

तालुक्यात शाळा खाजकिरणाचा पाहिला बळी . गावकऱ्यांचा प्रचंड विरोध

Spread the love

वाकी वाघोळा येथील शाळा बंद करण्याचे आदेश

कारंजा. / प्रतिनिधी

राज्यातील कमी पट संख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या शासनाच्या आदेशाला राज्यात झालेल्या प्रचंड विरोध आणि त्यानंतर सदर आदेश मागे घेत असल्याचे सरकारचे आश्वासन हे खोटे ठरवीत कारंजा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वाकी वाघोला येथील शाळा ऐन परीक्षेच्या तोंडावर बंद करण्याचे आदेश प. स.शिक्षण विभागामार्फत देण्यात आले. ही शाळा बंद करून शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक याना धामणी येथे पाठवण्याचे आदेश देणारे पत्र वाकी येथील शाळा मुख्याध्यापक याना देण्यात आले आहे त्यामुळे गावकरी संतप्त झाले आहेत.
आदेश मागे न घेतल्यास जिल्हा परिषद मुख्य कार्य पालन अधिकारी याचे दालनात शाळा भरविण्याचा इशारा गावकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
शाळा बंद करण्याच्या आदेश मिळताच गावात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यात गावातील ग्राम पंचायत आणि शाळा सुधार समिती सदस्यांनी पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी याना निवेदन देऊन आपल्या गावची शाळा बंद करू नये यासाठी निवेदन दिले. त्यात त्यांनी आपल्या गावातील भौगोलिक परिस्थिती ही विद्यार्थीना बाहेर शिक्षण घेण्यासाठी अनुकूल नसल्याचे सांगितले आहे. वाकी वघोळा या गावाला बेंबळा नदीने वेढलेले आहे. पावसाळ्यात त्यामुळे गावातून बाहेर पडणे शक्य होत नाही त्यामुळे विद्यार्थ्याचे शाळा बंद झाल्यास यांचे शिक्षण बंद होणार आहे .

वाकी येथील शाळा बंद झाली नसून जिल्हा परिषद शाळा धामणी येथे 173 विद्यार्थी संख्या असल्याने व तिथे तीनच शिक्षक असल्याने वाकी येथील तीन विद्यार्थी वाघोळा येथे पाठवण्याची व्यवस्था शिक्षण विभागाने केली आहे. धामनी येथील विद्यार्थी संख्या 173 असून शिक्षक मात्र तीन आहेत त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक*
*नुसकान होऊ नये या उद्देशाने वाकी येथील शिक्षक धामनी ला पाठवण्याचे आदेशित केले आहे परीक्षा* *संपल्यानंतर वाकी येथील विद्यार्थी संख्या आणि पंचायत समितीतील* *शिक्षकांची पूर्तता झाल्यावर वाकी येथील शिक्षक परत करण्यात येईल.*
श्रीकांत माने गटशिक्षणाधिकारी प स कारंजा.

 

आमच्या गावच्या शाळेवर प्रशासनाचे कायम दुर्लक्ष राहिल्याने पटसंख्या घातली आहे आज रोजी शाळेत कोणतीच सुख सोयी सुविधा उपलब्ध नाहीत शाळेत संडास , वॉल कंपाऊंड,आमचे येथील शिक्षक अविनाश शिरसाट यांनी पर्यंत करून जिद्दीनं शाळा उभी करण्यासाठी कष्ट घेतले आहेत त्यांनाच आता शाळेतून धामणी येथे पाठविण्याचा निर्णय हा दुर्दैवी आहे .आमच्या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक धामणी येथे पाठवताना शाळा व्यवस्थापन समिती,पालक गावकरी याना विश्वासात घेतले नाही त्यामुळे हा निर्णय हा क्लेशदायक आहे आम्ही या निर्णयाच्या विरोधात जाऊन गावाची शाळा वाचविण्यासाठी मां.जिल्हा कार्य पालन अधिकारी यांचेकडे विन्ती करीत आहोत त्यांनी आमची शाळा वाचविण्यासाठी आदेशित करावे ही आमची विनंती आहे असे न झाल्यास आम्ही सर्व गावकरी विद्यार्थी पालक सर्व मिळून जिल्हा परिषद मुख्य कार्य पालन अधिकारी याचे दालनात आमरण उपोषण करू.
राजू चव्हाण
अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती वाकी

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close