क्राइम

लुटलेला माल बारबालांवर लुटवला : दोन आरोपीना मुंबई येथून अटक 

Spread the love

नागपूर / विशेष प्रतिनिधी

                      गॅस एजन्सी मष्ये कार्यरत व्यवस्थापक कॅश भरण्यासाठी बँकेत जात असतांना टीकग्या गाडीला लाथ मारून तो खाली पडल्यावर त्याच्या हातातील कॅश असलेली बॅग घेऊन पळून जाणाऱ्या आणि ती रक्कम मुंबई येथिल बार बालांवर उधळणाऱ्या दोन आरोपींना पाचपावली पोलिसांनी मुंबई येथून अटक केली आहे.  तपीश बागडे आणि रुषभ कावळे, रा. जरीपटका अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

पाचपावली पोलीस ठाण्याअंतर्गत राणी दुर्गावती चौकात गजभिये यांची भारत गॅस एजन्सी आहे. एजन्सीत पखाले (६०) हे व्यवस्थापक म्हणून काम करतात. शनिवार १७ जुनला दुपारच्या सुमारास तीन लाखांची रक्कम घेवून एजन्सीतून स्कुटीने निघाले. लघूवेतन कॉलनीच्या मार्गावरून जात असताना डॉ. आंबेडकर रुग्णालयाच्या मागच्या भागात आरोपी त्यांच्या मागावर होते. एकाने त्यांच्या दुचाकीला लात मारली. त्यामुळे दुचाकीचे संतूलन बिघडून ते खाली पडले. त्याच वेळी त्यांच्या जवळील तीन लाख रुपये लुटले आणि पळाले. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून तपास केला. मात्र, आरोपींचा काही सुगावा लागला नाही.

दरम्यान आरोपी मुंबईतील एका हॉटेलमध्ये थांबले. एसीची हवा आणि चविष्ट भोजनावर ताव मारायचे. बारमध्ये जावून बारबालांवर पैसे उधळत होते. तीन चार दिवस मौजमस्ती केली. पत्ता लागू नये म्हणून त्यांनी जुना सीम काढला. नवीन मोबाईल खरेदी केला. मात्र, जरीपटका पोलिसांनी त्या दोघांनाही हुडकून काढले. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बकाल यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक प्रदीप काईट, गजानन निशीथकर, अमोल हरणे, पवन यादव यांनी केली.

घटनेची घेतली गंभीर दखल

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बकाल यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेतले. आरोपीच्या शोधासाठी एक पथक तयार केले. तत्पूर्वी तांत्रिक तपास करून त्यांचे लोकेशन मिळविले. पथकाने मुंबई गाठली. रस्त्याने जात असतानाच त्यांच्या मुसक्या आवळल्या.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close