क्राइम

महिला सीईओ ला मुलाचा खून केल्याच्या गुन्ह्यात अटक 

Spread the love
कर्नाटक / नवप्रहार मीडिया
 कर्नाटक पोलिसांनी एका खाजगी कंपनीच्या सीईओ ला मुलाचा खून केल्याचा आरोपा खाली अटक केलीं आहे. महिला घटस्फोटित असून पतीला मुलाला भेटता येऊ नये म्हणून तीने आपल्या 4 वर्षाच्या मुलाची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.सुजाना सेठ असे संशयित  महिला आरोपीचे नाव असून ती एका स्टार्ट अप कंपनीची फाउंडर मेम्बर आणि सीईओ असल्याचे समजते.
                पोलिसांनी दिलेल्या महिती नुसार सदर महिला ही आपल्या 4 वर्षाच्या मुलासह गोवा फिरायला गेली होती. ती जेव्हा रूम सोडून निघाली त्यानंतर तेथील रुम साफ करन्यायाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना खोलीत काही ठिकाणी रक्ताचे डाग दिसले.त्यांनी ही बाब लगेच मॅनेजर ला सांगितली. मॅनेजर ने लगेच पोलिसांना या बद्दल कल्पना दिली.
         पोलिसांनी घटनास्थळ गाठून चौकशी केली असता त्यांना खोलीत रक्ताचे डाग दिसले.त्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता ती एकटीच हॉटेल बाहेर पडताना दिसली. रुम बॉय नुसार ती आली तेव्हा तिच्या सोबात एक लहान मुलगा होता.
पोलिसांनी महिलेला केली अटक – सीसीटीव्ही फुटेज मध्ये महिला टॅक्सी मध्ये बसून निघून गेल्याचे आढळून आले.महिलेच्या हातात गेक बॅग होती.
पतीला मुलाला भेटता येऊ नये म्हणून मुलाचा खून – सूत्रांकडून मिळालेल्या महिती नुसार सॅन 2010 मध्ये सुजाना चे लग्न झाले. तिला 1019 मध्ये मुलगा झाला. 2020 मध्ये तिचे आणि पतीचे पटत नसल्याने घटस्फोट झाला. कोर्टाने या प्रकरणात निकाल देतांना मुलाला प्रत्येक रविवारी त्याच्या वडिलांसोबत भेटू द्यावे असे आदेश दिले होते.
मुलाला पतीला भेटू द्यायचे नसल्याने उचलले हे पाऊल – सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार सुजाना सेठ हिला मुलाला पहिल्या पती सोबत भेटू द्यायचे नव्हते म्हणून तिने मुलाची हत्या केल्याचे समजते.
What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close