क्राइम

भेसळयुक्त माल विकणाऱ्या दुकानदाराला अधिकाऱ्यांचे अभय ? 

Spread the love
चौकशी अधिकाऱ्याने वस्तुनिष्ठ चौकशी केली नसल्याचा पीपल्स रिपब्लिकन  चा आरोप 
सबंधित दुकानदार आणि अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी यासाठी सहायुक्तांकडे तक्रार
आर्वी / विशेष प्रतिनिधी
                 भेसळयुक्त जिन्नस विकणाऱ्या दुकानदारावर कारवाई करण्याचे सोडून त्याला अभय देणाऱ्या अधिकारी आणि दुकानदारावर कारवाई व्हावी या आशयाचे निवेदन आरपीआय कडून सहआयुक्त अन्न व औषधी विभाग यांना देण्यात येऊन कारवाईची मागणी केली आहे.
              या प्रकरणाबाबत अधिक माहिती अशी की शहरातील आंबेडकर वॉर्ड निवासी पवन गणेशराव पडोळे (35) यांनी त्याच वार्डात किराणा दुकान चालविणाऱ्या गोवर्धनदास रामुमल यांच्या कडून दि. 20 /04 / 2023 रोजी किराणा माल उचलला होता. या वस्तू पासून रात्रीचा स्वयंपाक तयार करण्यात आला होता. तो खाल्ल्यानंतर घरातील सगळ्या लोकांना मळमळ होऊन चक्कर आल्यासारखे वाटू लागले. खाण्यात काहीतरी आले असावे याची शंका आल्याने त्यांनी घरात ठेवलेले व ORS घेऊन कशीबशी रात्र काढली. ORS घेतल्यावर त्यांना काही प्रमाणात बरे वाटले.
             दुसऱ्या दिवशी त्यांनी ही बाब संबंधित दुकानदाराला सांगितली. पण त्यांनी त्याला गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे पडोळे यांनी याबाबत वर्धा येथील अन्न व औषधी प्रशासन विभागाकडे याबाबत तक्रार करून कारवाईची मागणी करीत लेखी तक्रार दिली. सदर प्रकरणाचा तपास यादव नामक आधीकाऱ्याकडे होता. पण त्याने आपल्या अहवालात संबंधित दुकानदाराला काळीं चिट दिली. या प्रकरणात वस्तुनिष्ठ चौकशी झाली नसल्याची तक्रार पीपल्स रिपब्लिकन पक्षाने अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या सहआयुक्तांकडे करून कारवाईची मागणी केली आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close