विदेश

डोनाल्ड ट्रम्प प्रकरणात एफबीआय ला फारसे यश नाही ! कोण आहे थॉमस मॅथ्यू क्रुक्स ? 

Spread the love

अमेरिका / नवप्रहार डेस्क

              निवडणुकी प्रचारा दरम्यान अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वर झालेल्या हल्ल्या संदर्भात एफबीआय ला फारसे यश आले नाही. एफबीआय ने हल्लेखोर थॉमस मॅथ्यू क्रुक्स याच्या बद्दल माहिती गोळा करणे सुरू केले आहे. वास्तविक थॉमस हा स्नॅपर्स यांनी प्रतिउत्तरदाखल केलेल्या गोळीबारात मारला गेला होता.

रात्रीतून अमेरिकेत थॉमस मॅथ्यू क्रुक्सच्या विरोधात घोषणाबाजी होऊ लागली. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला, त्याच क्षणी सिक्रेट सर्व्हिसच्या सदस्यांनी प्रतिहल्ला केला; ज्यात थॉमस मॅथ्यू क्रुक्सचा मृत्यू झाला. कोण होता थॉमस मॅथ्यू क्रुक्स? त्याने हा हल्ला कसा केला? या हल्ल्यामागील नेमके कारण काय? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

पेनसिल्व्हेनियाच्या बटलरमध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या काही तासांनंतर, फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) ने २० वर्षीय थॉमस मॅथ्यू क्रुक्सची शूटर म्हणून ओळख पटवली. सिक्रेट सर्व्हिस स्नॅपर्स ने एका छतावर लपून बसलेल्या क्रुक्सवर गोळ्या झाडल्या आणि त्याला जागेवरच ठार केले. एफबीआयने त्याचा फोटो प्रसिद्ध केला, ज्यात हल्लेखोर चष्मा घातलेला आणि कॅमेऱ्यात हसताना दिसत आहे. तो पिट्सबर्गमधील बेथेल पार्क येथील रहिवासी होता.

 

 

 

 

कोण होता थॉमस मॅथ्यू क्रुक्स?

शाळेत थॉमस मॅथ्यू क्रुक्स गणित या विषयात हुशार होता. ‘पिट्सबर्ग ट्रिब्यून-रिव्ह्यू’नुसार, त्याला राष्ट्रीय गणित आणि विज्ञान उपक्रमाकडून ५०० डॉलर्सचा ‘स्टार पुरस्कार’ मिळाला होता. त्याने २०२२ मध्ये बेथेल पार्क हायस्कूलमधून पदवी प्राप्त केली. त्याच्या माजी वर्गमित्रांनी त्याचे वर्णन ‘शांत स्वभावाचा’ आणि ‘अलिप्त राहणारा’ म्हणून केले,  क्रुक्सच्या एका माजी वर्गमित्राने सांगितले की, त्याचा फार मोठा मित्रपरिवार नव्हता. त्याच्या दिसण्यावरून आणि शाळेत शिकारीसारख्या दिसणार्‍या त्याच्या कपड्यावरून मुले त्याला त्रास द्यायची. बीबीसीच्या वृत्तानुसार, क्लेरटन स्पोर्ट्समेन्स क्लब या स्थानिक शूटिंग क्लबमध्ये त्याने किमान एक वर्षाची सदस्यता घेतली होती.

त्याच्या हायस्कूलच्या प्राध्यापकांनी त्याचे वर्णन ‘आदरार्थी’ असे केले आणि त्यांनी सांगितले की क्रुक्सचा राजकारणाशी काही संबंध असल्याचे त्यांना कधीच माहीत नव्हते. त्याने कधी राजकारणाविषयी किंवा ट्रम्पविषयी चर्चा केल्याचे कोणत्याच वर्गमित्रांना आठवले नाही. परंतु, त्याला या विषयात रस असल्याचे दिसून आले. त्याने २०२१ मध्ये मोहीमा चालविणार्‍या ‘ॲक्ट ब्लु’ला १५ डॉलर्स देणगी दिल्याची माहिती आहे. त्याने देशाचा नागरिक म्हणून १८ वर्षांचे होण्याच्या एका आठवडापूर्वीच मतदान करण्यासाठी नोंदणी केली, असे सार्वजनिक रेकॉर्डमध्ये उघड झाले. या वर्षीची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक ही पहिलीच होती; यात तो मतदान करणार होता.

नाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला, त्याच क्षणी सिक्रेट सर्व्हिसच्या सदस्यांनी प्रतिहल्ला केला; ज्यात थॉमस मॅथ्यू क्रुक्सचा मृत्यू झाला. (छायाचित्र-लोकसत्ता संग्रहीत)विशेष म्हणजे त्याचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नव्हता. तो आपल्या पालकांसह अगदी मध्यमवर्गीय जीवन जगला आणि एका नर्सिंग होममध्ये कामही केले. नर्सिंग सेंटरच्या प्रशासक मार्सी ग्रिम यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘थॉमस मॅथ्यू क्रुक्सने प्रामाणिकपणे त्याचे काम केले. त्याचा घटनेत सहभाग असल्याचे ऐकून आम्हाला धक्का बसला आणि वाईट वाटले.’

हा हल्ला कसा करण्यात आला?

हल्ल्याच्या दिवशी, क्रुक्सने त्याच्या घरापासून एक तासाचा प्रवास केला. बटलर फार्म शोच्या शेजारी असलेल्या काचेच्या एका संशोधन कंपनीच्या छतावर तो चढला. इथेच ट्रम्प यांनी रॅली आयोजित केली होती. या हल्ल्यासाठी त्याने एआर-१५ रायफल वापरली. ट्रम्प व्यासपीठावर उभे असताना त्याने छतावरून गोळीबार केला. हे अंतर एकूण १५० मीटर होते. रॅलीमध्ये किमान पाच गोळ्या ऐकू आल्याचे सांगण्यात येत आहे. या गोळीबारात ट्रम्प जखमी झाले. गोळी त्यांच्या उजव्या कानाला लागून गेली, ज्यात एकाचा मृत्यू झाला. शूटरच्या मृतदेहाशेजारी सापडलेले शस्त्र त्याचे वडील मॅथ्यू क्रुक्स यांचे होते.

ही रायफल मॅथ्यू क्रुक्स यांनी कायदेशीररित्या खरेदी केली होती, असे एफबीआय अधिकाऱ्याने ‘यूएसए टुडे’ला सांगितले. परंतु, त्यांना रायफल वापरण्याची परवानगी होती की नाही हे तपासकर्त्यांना अद्याप कळालेले नाही. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार शूटरच्या कारमध्ये स्फोटके सापडली आहेत. ‘एबीसी न्यूज’ला एका सूत्राने सांगितले की, स्फोटके ग्रेनेडसारखी दिसत होती. मात्र, अधिकारी फॉरेन्सिक अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. एफबीआयने रविवारी सांगितले की, क्रुक्सच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये कोणतीही धमकी देणारी भाषा वापरली नसल्याची माहिती आहे. त्याला कोणतीही मानसिक समस्या नव्हती, अशीही माहिती समोर आली आहे.

कुटुंबाला बंदुकांची आवड

या घटनेनंतर आता शूटरच्या कुटुंबाचा तपास सुरू आहे. यात तापसकर्त्यांना फार काही मिळाले नाही. त्याचे कुटुंब बंदुका खरेदी आणि विक्री करणाऱ्या बाजारपेठेशी जुळले असल्याची माहिती समोर आली आहे, असे वृत्त ‘यूएसए टुडे’ने दिले आहे. एआर-१५ शैलीतील रायफल मॅथ्यू क्रुक्सने २०२० मध्ये ‘बोटॅक’कडून खरेदी केली होती. ही वेबसाइट बंदुकांच्या प्रमुख किरकोळ विक्रेत्यांपैकी एक आहे, असे या वृत्तात सांगण्यात आले आहे. परंतु, त्याने बंदूक खरंच खरेदी केली की नाही हे स्पष्ट झालेले नाही.

हल्ल्याचा हेतू काय?

माजी राष्ट्राध्यक्षांच्या हत्येचा प्रयत्न झाल्यानंतर एफबीआय या प्रकरणाचा शोध घेत आहे. गोळीबाराचा हेतू अद्याप समोर आलेला नाही. ‘एफबीआय’ एजंट केविन रोजेक यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांना या घटनेबद्दल फारसे काही हाती लागलेले नाही. गोळीबाराच्या एका दिवसानंतर, रविवारी पहाटे बॉम्बच्या धमकीबद्दल क्रुक्सच्या शेजाऱ्यांनी माहिती दिली आणि दावा केला की, क्रुक्सच्या आजूबाजूच्या घरांना ही धमकी देण्यात आली होती. ‘फायनान्शिअल टाईम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार बॉम्बशोधक पथकाची गाडी या लोकांच्या निवासस्थानी पोहोचली. त्यादरम्यान घरांमध्ये स्फोटकेही सापडली. क्रुक्सच्या घराजवळील रस्त्याच्या काही भागात नाकाबंदी करण्यात आली होती.

क्रुक्सच्या आजूबाजूच्या शेजार्‍यांनी त्याच्या कुटुंबाचे कौतुकच केले आणि त्यांनी सांगितले की, त्याचे आई-वडील आणि कुटुंब हे सर्व खरोखरच छान लोक आहेत. अधिकारी क्रुक्स कुटुंबाची चौकशी करत आहेत. मात्र, हल्लेखोर थॉमस क्रुक्सच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न मागे सुटले आहेत. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या तरुणाला डोनाल्ड ट्रम्प यांना का मारायचं होतं?

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close