भंडारा गौतमबुद्ध वार्डमध्ये परिस्थिती गंभीर: नागरिक त्रस्त
भंडारा नवप्रहार प्रतिनिधी /हणाराज
भंडारा: भंडारा जिल्ह्यातील समता नगर, गौतमबुद्ध वार्ड, प्रभाग क्र. ४ मध्ये मागील ६ ते ७ वर्षांपासून नाली आणि नाल्याचे नियोजन नसल्यानं आणि सफाईच्या अभावामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट झाली असून, लोकांच्या घरात पाणी शिरले आहे.
स्थानिक नागरिकांनी वारंवार प्रशासनकडे तक्रार केली आहे, परंतु प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे नागरिकांच्या त्रासात भर पडली आहे. रोहित बरीयेकर, नितिन चौबे, विजय कटबरे यांच्यासह अनेक लोकांच्या घरात पाणी घुसले असून, त्यांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.
नाल्यांची सफाई न झाल्यामुळे आणि नियोजनाअभावी पावसाच्या पाण्याने घरांत प्रवेश केला आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नागरिकांत संताप वाढत आहे. तातडीने उपाययोजना करून समस्या सोडवाव्यात, अशी मागणी नागरिकांनी पुन्हा केली आहे.
नगरपरिषदेणे या समस्येचे त्वरित निराकरण करावे आणि नाली-नाल्यांचे योग्य नियोजन करून सफाईचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी अपेक्षा नागरिकांमध्ये आहे. पावसाळ्यात अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने पावले उचलणे आवश्यक आहे.