श्री बाबासाहेब कवाद सेवाभावी संस्थेच्या न्यू इंग्लिश मेडियम स्कूलच्या बाल वारकऱ्यांचा दिंडी सोहळा उत्साहात साजरा .
पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील यांजकडून ] – पठारवाडी येथील श्री बाबासाहेब कवाद सेवाभावी संस्थेचे न्यू इंग्लिश मेडियम स्कुल व किंडरगार्टन स्कुलचे नर्सरी ते इयत्ता ६वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीचे निमित्ताने निघोज मध्ये दिंडी व पालखी सोहळ्याचे दिमाखदार असे आयोजन केले होते .
विठू माऊली च्या जयघोषाने अवघे वातावरण दुमदुमून गेले होते. पारंपारिक वेशभूषा केलेले विदयार्थी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते . त्याचप्रमाणे वाटेमध्ये ठिकठिकाणी दिंडीचे जोरदार स्वागत करण्यात आले .भक्तजन पालखी थांबवून विठुरायाचे दर्शन घेत होते . बाल गोपाळांचा हा दिंडी सोहळा पाहणाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. भारतीय संस्कृतीची प्रचिती या दिंडी सोहळ्या मधून दिसून येत होती. न्यू इंग्लिश मेडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आयोजन केलेल्या दिंडीला निघोज मध्येच पंढरपूरचे स्वरूप आले होते . बालगोपाळांची दिंडी पाहून उपस्थितांची मन अगदी भारावून गेली. या दिंडी सोहळ्याचे नियोजन प्राचार्य डायस सर व न्यू इंग्लिश मेडीअम स्कुल चे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले होते .