रिल्स बनवताना घडला भयंकर अपघात
काही अपघाताचे व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो. सध्या असाच एक अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुण रुळावर फोटोशूट करत आहे. अचानक त्याच्या मागून रेल्वे येते आणि त्याला धडक देते. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. सध्या हा थरकाप उडवणारा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर अनेक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अपघाताचे व्हिडीओ तर नेहमी चर्चेत येतात. काही अपघाताचे व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो. सध्या असाच एक अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुण रुळावर फोटोशूट करत आहे. अचानक त्याच्या मागून रेल्वे येते आणि त्याला धडक देते. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. सध्या हा थरकाप उडवणारा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
हल्ली तरुण मुलांना फोटोशूटचे भयानक वेड लागले आहे. वाट्टेल त्या जागी फोटोशूट करताना दिसतात. रेल्वे रुळावर फोटो शूट करण्याचे क्रेझ तरुणाईमध्ये दिसून येते. रेल्वे रुळावर फोटोशूट करतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जरी पोलिसांनी रुळावर फोटोशूट करण्यास बंदी घातली असली तरी सुद्धा लोकं ऐकत नाही आणि अपघाताला बळी पडतात. या व्हिडीओत सुद्धा तुम्हाला दिसेल की या तरुणाला फोटोशूट करणे चांगलेच भोवले. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही चांगलाच धक्का बसेल.
या व्हायरल व्हिडीओ एका रेल्वे रुळावरील आहे. एक तरुण रेल्वे रुळावरुन चालताना दिसत आहे. तो फोटोशूट साठी रुळावरुन चालत असतो. अचानक मागून खूप वेगाने रेल्वे येते आणि त्याला धडक देते. रेल्वेच्या धडकेत या तरुणाचा अपघात होतो. हा तरुण जीवंत आहे की नाही, याविषयी अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही.हा व्हिडीओ पाहून कुणाच्याही अंगावर काटा येईल.
खरं तर रुळावर फोटो शूट करण्यावर बंदी घातली असली तरी तरुण मंडळी का रुळावर फोटोशूट करतात. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता फोटोशूच्या आहारी जाणे, खरंच खूप चुकीचे आहे.
Wild clips या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आणखी एक रेल्वे अपघात” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप धक्कादायक होतं. तो वाचला का?” तर एका युजरने लिहिलेय, “या तरुणाला ट्रेनचा आवाज आला नसेल का?” आणखी एका तरुणाने विचारलेय, “हा खरंच अपघात होता की आत्महत्या होती?