राजकिय

शेतकऱ्यांच्या पाणी आणि वीज प्रश्नावर चंद्रशेखर राव कडाडले

Spread the love

तलाठ्यांनाही केले लक्ष 

संभाजीनगर / नवप्रहार न्यूज नेटवर्क

                     तेलंगाणाचे मुख्यमंत्री आणि YSR पक्ष प्रमुख चंद्रशेखर राव यांनी संभाजी नगर येथे झालेल्या सभेत महाराष्ट्र सरकारवर कडाडून तिला केली. त्यांनी शेतकऱ्यांच्या ज्वलंत बीज आणि पाण्याच्या विषयाला हात घालून तुम्ही आमच्या पक्षाला निवडून द्या मग बघा असे म्हणत शेतकऱ्यांच्या मर्मावर बोट ठेवले आहे. त्यांनी तलाठी हे ब्रह्मदेव आहेत ? त्यांच्या मनात येईल त्यांना जमीन लिहून देतात असे म्हणत तलाठी हा विषयच संपवून टाकायला पाहिजे असे वक्तव्य केले.

केसीआर यांनी नागपूर, विदर्भात सभा घेण्यास सुरुवात केली आहे. यावर फडणवीसांनी त्यांनी तुम्ही महाराष्ट्रात का येताय, तेलंगानाच सांभाळा, असे विचारल्याचे केसीआर म्हणाले. यावर केसीआर यांनी मी महाराष्ट्रातून निघून जाईन, पण या दोन गोष्टी करा, मगच, असे आव्हान दिले आहे.

केसीआर यांची आज छत्रपती संभाजी नगरमध्ये सभा झाली. यामध्ये त्यांनी तलाठ्यांनाही लक्ष्य केले. तेलंगानात आम्ही तलाठी व्यवस्थाच संपवून टाकली आहे. मोदी सांगतात डिजिटलाझेशन करा, मग शेतकऱ्यांचे का केले जात नाहीय. आम्ही केलेय. तलाठी किती पावरफुल आहेत महाराष्ट्राचे. मुख्यमंत्र्यांपेक्षा आहेत. हे ब्रम्हदेव आहेत. ज्याच्या नशीबात हवे त्याला ते जमिन लिहून देतात. यामुळे आम्ही तेलंगानात तलाठी व्यवस्थाच बंद केली. शेकऱ्यांना एकरी १० हजार देतो, ते अधिकाऱ्यांमार्फत नाही. थेट देतो. शेतकऱ्यांचा विमा मृत्यू झाल्याच्या आठ दिवसांच्या आत घरी जाऊन पाच लाख रुपये दिले जातात. शेतकऱ्यांचे धान्य आम्ही तिथे जाऊन खरेदी करतो. त्याचा पैसाही थेट खात्यात जातो. कोणी दलाल नाही, असे केसीआर म्हणाले.

शेतकऱ्यांनो येती जिल्हा परिषद निवडणूक तुमच्या हातात आहे. एकदा गुलाबी झेंडा फडकवा तुमच्या मागे काय काय नाही येत ते बघा. उपमुख्यमंत्री फडणवीस मला सांगत होते की तुमचे इकडे काय काम आहे. तुम्ही तेलंगानाच सांभाळा. मी त्यांना म्हणालो मी तेलंगाना सांभाळले, आता महाराष्ट्रात आलोय. देशात कुठेही जाऊ शकतो. शेतकऱ्यांना तेलंगाना जे देतेय ते द्या मी मध्य प्रदेशला जातो. करा तुम्हीच राज्य. महाराष्ट्रात पैशांची कमी नाहीय, मनाची कमी आहे, असे आव्हान केसीआर यांनी दिले.
यानंतर मी तेलंगानात दलित बंधू मोहीम सुरु केलीय. फडणवीसांना मी सांगतो तुम्हीही दलित बंधू योजना सुरु करा. मी महाराष्ट्रातून निघून जातो, असे केसीआर म्हणाले.

पाण्यावर काय बोलले…
बीआरएस पक्षाने नागपूरमध्ये कायमस्वरुपी कार्यालय उघडले आहे. इथेही भाड्याने नाही तर कायमचे कार्यालय स्थापन करणार आहोत. इथे पाणी नाहीय, अकोल्यात नाहीय. पुण्यातून वकील आले ते म्हणाले तिथेही काही ठीक नाहीय. काय चाललेय इथे. पाणी आणि वीज या दोन गोष्टी सर्वांनाच लागतात. नेहरुंच्या काळात काहीतरी योजना बनत होत्या, आता नालायक पक्षांमुळे देश सहन करत आहे. देशात पाणी वापरात आले पाहिजे तर चांगले बंधारे बांधले गेले पाहिजेत. झिम्बाब्बेमध्ये पाणी साठवले जाते. तिथल्यासारखे देशात तीन चार धरणे असायला हवीत. परंतू केले जात नाहीय. नवीन रचना, नवीन कायदे आणले नाहीत तर हे होणार नाहीत. पाण्याला समजण्यासाठी आपला देशा आजही मागे आहे. माणूस पाण्याला बनवू शकत नाही, असे केसीआर म्हणाले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close