सामाजिक

मनमानी करणाऱ्या अवादा कंपनीवर कारवाई साठी शेतकरी उपोषणावर

Spread the love
चांदुर रेल्वे / प्रकाश रंगारी
               शेताच्या धुऱ्यावरील झाडे वीणा परवानगी तोडणाऱ्या आणि पांदन रस्ता ताब्यात घेऊन त्यावर प्लांट शेड उभे करून शेतकऱ्यांच्या वाहीवाटीचा रस्ता बंद करणाऱ्या कंपनी विरोधात कारवाई करावी आणि नुकसान भरपाई द्यावी यासाठी शेतकरी आणि माजी सरपंच यांनी उपोषण आरंभिले आहे.
              अवादा कंपनी ने मौजा शिरजगाव कोरडे, येथे गट नं. ९१. क्षेत्रफळ २ हेक्टर ५७ आर, याप्रमाणे सामाईक जमिन आहे. शिरजगाव कोरडे, तुळजापुर व दिलावरपुर या गावातील काही शेत जमिनीवर अवादा सोलर कंपनीचे सोलर प्लॉट लावले  आहे सदर कंपनीने इंद्रपल रामचंद्र बनसोड यांच्या   शेताचे धुन्ऱ्यावरील दोन झाडे निंबाची एक बाभुळीचे व 3. एक चारोळीचे झाड बुडापासुन कापुन नष्ट केले, परिणामी अंदाजे रु. १,५०,०००/ – (एक लक्ष पन्नास हजार रु.) नुकसान झालेले आहे. याबाबत आपल्या कार्यालयात, तहसिलदार कार्यालयात व वनविभागाकडे तक्रारी दिल्या होत्या परंतु  नुकसानीचा 25 मोबदला मिळाला नाही.
तसेच सरकारी पांधन रस्ते ताब्यात घेऊन रत्यावरील झाडे तोडली. सरकारी रस्त्यावर अतिक्रमण करुन प्लॉन्ट शैड उभे केले व शेतकऱ्यांचा वहिवाटीचां रस्ता बंद केलेला आहे.
बनसोड यांच्या शेतातील तोडलेल्या झाडाची नुकसान भरपाई तसेच सरकारी पांधन रस्ते २४/१०/२०२३ च्या आत मोकळे करावे तसे पत्र दिनांक ०६/१०/२०२३ ला आपल्या कार्यालयात सादर केले आहे परंतु पत्रात काही निकाल न लागल्यामुळे नाईलाजास्तव बनसोड यांना उपोषण मांडावे लागले आहे. या कारणाने ते दि.२५ /१०/२०२३ पासून उपोषणावर बसले आहेत.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close