मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी, शेतकरी पुत्रांने लिहिले मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र
शेतकरी पुत्र हर्षल मोतीराम फदाट यांने लिहिलेले रक्ताने पत्र,मनोज जरांगे पाटलांच्या केले स्वाधीन
जाफराबाद / प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण नसल्याने कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये बुद्धिमत्ता, गुणवत्ता असूनही त्यांना नोकऱ्यांपासून वंचित राहावे लागत असल्याने मराठा समाज पुरता उरपळून निघत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या नशिबी पडणाऱ्या, कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळामुळे शेतकरी मेटाकुटीला आहे. त्यातच मुलांच्या शिक्षणाचा खर्च डोईजड झाला आहे. आरक्षण नसल्यामुळे मराठा समाजाची वाताहत पाहता “दुष्काळ जगू देत नाही अन आरक्षण शिकू देत नाही” अशी दयनीय अवस्था बोरगाव बु (ता.जाफ्राबाद) येथील शेतकरी पुत्र हर्षल मोतीराम फदाट (पाटील) यांनी आपल्या रक्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून मराठा तरुणांची कैफियत मांडली आहे. सदरील पत्र हर्षल पाटील फदाट यांने जाफ्रबाद येथील जाहीर सभेदरम्यान मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांना दिली आहे.
१४ ऑक्टोंबर रोजी अंतरवाली सराटी मध्ये दीडशे एकर मध्ये सभेची आयोजन करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बोरगाव बु (ता.जाफ्राबाद) येथील हर्षल मोतीराम फदाट या शेतकरी पुत्रांनी आपल्या रक्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे “दुष्काळ जगू देत नाही,आरक्षण शिकवू देत नाही” शिवाय मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील हे अनेक दिवसांपासून आंदोलन,आमरण उपोषण करत आहे.त्यांच्या पाठीशी मराठा समाज उभा आहे.आपण मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी हर्षल मोतीराम फदाट यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना रक्ताने लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. सदरील पत्र हे जाफ्राबाद येथे जाहीर सभेत म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्याकडे स्वाधीन करण्यात आली.
‘कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ’ हा शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. शिवाय आरक्षण नसल्यामुळे मराठा समाजातील मुला-मुलींना नोकर्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आपण रक्ताने मुख्यमंत्री साहेबांना पत्र लिहिले आहे.आता तरी मराठा समाजाला आरक्षण द्यावी ही अपेक्षा…
– हर्षल मोतीराम फदाट (पाटील)
शेतकरी पुत्र