घाटंजी तालुक्यातील शेतक-यांच्या विवीध मागण्या घेऊन वंचित चा कृषी अधिकारी कार्यालयावर हल्ला बोल
घाटंजी तालुका प्रतिनिधी- सचिन कर्णेवार
शेतकरी व्यथा घेऊन वंचीतने दी ६/६/२४ ला घाटंजी कृषी अधिकारी कार्यालयावर धड़क दीली. शेतकऱ्याने ढोर मेहनत करुन पेरायचे आणि उगवायच एवढेचं शेतकऱ्यांचे जगणे आहे का? काबाड कष्ट करुन दरवर्षी हजारो रूपये मातीत टाकुन निसर्गावर अवलंबून राहत पाऊस येईल का.? बियाणे उगवेल का.? उगवलेल्या मालास भाव चांगला मिळेल का. ? ही प्रश्न माणगुटीवर घेऊन शेतकरी जगतो. या प्रश्नाची उत्तर काहीही माहित नसतं. केवळ आशेवर महागडे बियाणे मातीत टाकुन आयुष्याचा जुगार खेळल्या सारख मातीत पिंक टाकाव लागत त्यात ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर काही पैशाची लालची कृषी केंद्र धारका पासून सर्रास बोगस बियाण्याची विक्री केली जात आहे. शेतकऱ्यांच्या जमिन पत न जाणता शेतकरी मागणी प्रमाणे त्यांना बियाणे उपलब्ध होत नाही. सध्या ६५९ राशी सारख्या बियाण्याला शेतकऱ्याची मागणी आहे, परंतु कंपनी कृत्रिम तुटवडा निर्माण करते. कारण त्याना त्यांचा स्वार्थ साधायचा असतो. एंन हंगामात तूतवडा कारण देत दर वाढवुन बाजारात माल उपलब्ध केल्या जातो. यासाठी शासनाने उपाय योजना करून कंपन्याची मनमानी थांबवावी कंपनी डिलर, संबधीत व्यापाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी. तसेच शेतीसाठी अतीमहत्वाचा घटक रासायणिक खते हे काही साठेबाज बहादुर करतात ते ही रास्त भावाने उपलब्ध होत नाही. वेळेवर ती जादा दराने विक्री केली जाते.मागणी वाढली की, भेसळयुक्त्त खते शेतकऱ्याच्या मस्तकी मारून दिशाभूल केली जात. नॅनो युरिया लिक्वीड घेतल्या शिवाय युरीया मिळत नाही. ही शेतकऱ्याची लुट थांबविण्यात यावी शेतकऱ्याना विविध कार्यकारी सोसायटी मधुन बँकानी कर्ज त्वरित वितरीत करावे.अश्या विविध मागण्या घेऊन शेतकऱ्याना न्याय मिळवुन देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी घाटंजी च्या वतीने घाटंजी तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली.यावेळी सुरेशसिंग एस. राठोड तालूका कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी घाटंजी तालुकाध्यक्ष संघपाल कांबळे, नितीन राठोड,प्रेमानंद उमरे, अनिल रामटेके,मनोज मुनेश्वर,राजू नारायणे,रा.वि.नगराळे, संपत गुडे,तुकाराम कोरवते,हरी जीवने, यशवंत भगत,सचिन राठोड, राजू खरतडे, साहिल रामटेके, वीरेंद्र पिलावन, दीक्षांत वासनिक , सुरज रामटेके , बालू बरसागडे ,चंद्रकांत कांबळे,मारबते,अनिकेत राठोड,सागर राठोड अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते .
००००००००००००००००००००