शेतकऱ्यांना सात बारा ऑनलाईन मिळतो तर विद्यापीठाची पदवी का नाही
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ सिनेट सभेत डॉ नितीन टाले यांचा परखड प्रश्न
अमरावती / प्रतिनिधी
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आज शासनाच्या सर्व विभागाचे कामकाज ऑनलाईन पद्धतीने होते. परंतु उच्च शिक्षण व तंत्र शिक्षणाची व्यवस्था करणाऱ्या विद्यापीठा मध्ये मात्र अजूनही विद्यार्थ्यां संबंधित विविध कामकाज व प्रमाणपत्रे प्राप्त करण्याकरिता ऑफलाईन पद्धतीचा अवलंब केला जातो.
आज शेतकऱ्यांना सात बारा ऑनलाईन मिळतो, लडकी बहीण चा अर्ज ऑनलाईन करून त्यांना लाभ प्राप्त होतो. परंतु विद्यापीठा मार्फत मात्र पारंपरिक पद्धतीने प्राप्त होतात.
चहा टपरी पासून भाजीपाला वाला आज फोन पे चा वापर करतात परंतु विद्यापीठात विद्यार्थ्यांना विविध शुल्क भरणा मात्र नगदी स्वरूपात करावा लागतो. त्यामुळे विदयार्थ्यांची गैरसोय होते.हे योग्य नाही त्यामुळे विद्यापीठाच्या कामकाजाचे डिझिटलायसेश करून विद्यापीठ प्रशासन गतिमान करावे अशी मागणी डॉ नितीन टाले यांनी सिनेट सभागृहात केली.