कृषक कन्यात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
आर्वी / प्रतिनिधी
स्थानिक कृषक कन्या विद्यालय,आर्वी येथे मार्च 2024 ला माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्ग 9वीच्या विद्यार्थ्यांकडून निरोप देण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्यध्यापिका सौ. अनघा कदम तर प्रमुख अतिथी म्हणून वर्ग10 चे वर्गशिक्षक श्री. दिनेश शेळके व श्री.राकेश ढोले उपस्थित होते. सर्वप्रथम सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन व द्वीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली याप्रसंगी सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना परीक्षे करिता शुभेच्छा देऊन भविष्यातील वाटचाली करिता मार्गदर्शनपर संदेश दिला. वर्ग 9 व 10 च्या सर्व विद्यार्थ्यांना अल्पोहार देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कु. संगीता तेलगोटे मॅडम व कु. मंगला बेलसरे मॅडम वर्ग 9 च्या विद्यार्थ्यांनी तसेच सौ सोनटक्के व सौ हत्तीमारे यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला श्री.उमेश फुलंबरकर.श्री.आशिष देशमुख ,श्री. मनोज गडेकर ,श्री.महेश ढवळे ,श्री. लक्ष्मण शेळके ,कु.योगिता जट्टेवार ,कु.प्रमिला वरखडे ,कु वनश्री कडू ,कु.उज्वला झटाले,कु. जोत्सना चरडे तसेच श्री.संतोष खांडेकर श्रीमती कोडापे उपस्थित होते.