एस ओ एस कब्स येथे फॅन्सी ड्रेस ऍक्टिव्हिटीचे आयोजन
स्वातंत्र दिनाचे औचित्य
धमाणगाई रेल्वे ,/ प्रतिनिधी
श्री दत्ताजी मेघे बाल कल्याण शिक्षण संस्था द्वारा संचालित स्कूल ऑफ स्कॉलर्स कब्स मध्ये भारतीय स्वातंत्र दिनाच्या औचित्याने फॅन्सी ड्रेस ऍक्टिव्हिटी मोठ्या आनंदात पार पडली. सर्व विद्यार्थी भारतीय स्वातंत्र सैनिकांच्या वेशभूषेत आले होते. सर्व विद्यार्थ्यानी स्वतः बनलेल्या स्वातंत्र सैनिकांविषयी योग्य ती माहिती सांगितली. सर्व शिक्षिका पांढऱ्या रंगाच्या वेशभूषेत आल्या होत्या. कार्यक्रमाचे संचालन वर्षा देशमुख यांनी केले आणि पर्यवेक्षिका शबाना खान यांनी मार्गदर्शन केले .
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्या के साई नीरजा व पर्यवेक्षिका शबाना खान, प्रणिता जोशी ,रेणुका सबाने , वर्षा देशमुख ,सारिका चिंचे , हर्षिता श्रीवास ,वृषाली काळे , हर्षदा ठाकरे , पूजा मांडोकार व सुप्रिया धोपटे यांनी अथक प्रयत्न केले .