क्राइम

निवृत्त प्राध्यापकाची हत्या केल्या प्रकरणी प्रसिद्ध रिल स्टार आणि त्याच्या मित्रांना अटक

Spread the love

छत्रपती संभाजीनगर / विशेष प्रतिनिधी

एका माजी प्राध्यापकाच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी येथील प्रसिद्ध रिल स्टार आणि त्याच्या दोन मित्रांना अटक केली आहे. एलसीबीने अतिशय तांत्रिक पद्धतीने हा तपास करून ४० दिवसानंतर हत्येचा छडा लावत आरोपींना अटक केली आहे.

 

आरोपीचे नाव विशाल राठोड आहे.  हत्या केल्यानंतर लोंढे यांचा मृतदेह गेवराई तांड्यातील जंगलात ८ फूट खोल खड्ड्यात पुरण्यात आला होता. ४० दिवसानंतर लोंढे यांचा मृतदेह मिळाल, ते दीड महिन्यापासून बेपत्ता होते. हत्येचा हा थरार अंगावर काटा आणणारा आहे. निवृत्त प्राध्यापक राजाभाऊ सुभराव लोंढे यांची या प्रकरणी मुख्य आरोपी रील स्टार विशल राठोड आणि त्याच्या दोन साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरातील उस्मानपुरा भागातून महिनाभरापूर्वी बेपत्ता झालेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या निवृत्त विभाग प्रमुखाचा (HOD) आर्थिक वादातून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अत्यंत कौशल्याने तपास करत मुख्य सूत्रधारासह तिघांना अटक केली असून, तब्बल ४० दिवसांनंतर मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढला आहे. विशाल विकास राठोड (वय २४, रा. गेवराई तांडा), आकाश विनोद पवार (वय ३२, रा. गेवराई तांडा) आणि करण विलास आडे (वय २२, रा. गिरनेर तांडा), अशी आरोपीची नावे आहेत.

नेमकी घटना काय?

ज्योतीनगर येथील अभिरिका अपार्टमेंटमध्ये राहणारे राजाभाऊ सुभराव लोंढे (वय ६०) हे ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास बेपत्ता झाले होते. त्यांचे भाऊ उत्तम लोंढे यांनी ६ फेब्रुवारी रोजी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात ते हरवल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी तपास केला असता, राजाभाऊ लोंढे हे शेवटचे त्यांचे मित्र विशाल राठोड, आकाश पवार आणि दोन महिलांसोबत दौलताबाद येथील एका फार्महाऊसवर पार्टीसाठी गेले होते, असे समोर आले.

पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

आरोपी विशाल राठोड याने सुरुवातीला पोलिसांना सांगितले की, पार्टी संपल्यानंतर ६ फेब्रुवारीला पहाटे ५ वाजता त्याने लोंढे यांना सिग्मा हॉस्पिटलजवळ सोडले होते. मात्र, महिना उलटूनही लोंढे यांचा पत्ता न लागल्याने त्यांच्या नातेवाईकांनी पोलीस आयुक्त प्रविण पवार यांची भेट घेतली. आयुक्तांनी या प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे शाखेकडे सोपवला.

असा झाला खुनाचा खुलासा

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि CCTV फुटेजची तपासणी केली असता, आरोपींच्या जबाबात मोठी तफावत आढळली. पोलिसांनी विशाल राठोडला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी विशाल आणि राजाभाऊ लोंढे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आर्थिक देवाणघेवाणीवरून वाद सुरू होते.

गोळ्या झाडून हत्या :

५ फेब्रुवारीच्या रात्री पार्टीमध्ये लोंढे यांना भरपूर दारू पाजल्यानंतर, शहराकडे परत येत असताना साजापूर शिवारातील रेल्वे पुलाजवळ विशालने पिस्तूलने त्यांच्या डोक्यात गोळी झाडून त्यांची हत्या केली. खून केल्यानंतर आरोपीने मृतदेह गेवराई तांड्याजवळील जंगलात नेला. तिथे आधीच खोदलेल्या एका खड्ड्यात मृतदेह टाकून जेसीबीच्या साहाय्याने त्यावर माती टाकून पुरावा नष्ट केला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close