विदेश

प्रसिद्ध हॉलीवुड अभिनेत्याच्या आईची हत्या

Spread the love
                 हॉलिवूड चे प्रसिद्ध अभिनेते मार्टि यॉर्क च्याआईचे तिच्या राहत्या घरी मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली आहे. डेल नॉर्ट काउंटी शेरीफ डेप्युटी डिआना इस्माईल असे तिचे नाव आहे.
डिआना यांच्या खूनाचा तपास केला जात आहे. याशिवाय पोलिसांनी एक अलर्ट जारी केला असून संशयिताचा शोध घेतला. यातील मुख्य आरोपीला अटक ताब्यात घेण्यात आले आहे. डिआना यांचा प्रियकर डॅनियल जेम्स वॉल्टर या
प्रकरणात मुख्य संशयित होता. हा प्रियकर
कायदेशीररित्या त्याचे नाव बदलून एडवर्ड पॅट्रिक डेव्हिस नावाने सगळीकडे फिरत होता. डेल नॉर्टे काउंटी शेरीफ कार्यालयाने शुक्रवारी संध्याकाळी वॉल्टरला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.
अभिनेता यॉर्कने शुक्रवारी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याच्या आईच्या मृत्यूची पुष्टी केली. “मला लिहिण्यासाठी खूप कठीण जातंय परंतु मला काल रात्री शेरीफ विभागातून कळले की माझ्या आईची हत्या झाली. ती ज्या माणसाला ओळखत होती त्यानेच तिची हत्या केल्याचं तिने सांगितलं”
तो पुढे म्हणाला, “माझ्या मनात सध्या राग, सूड, रडणे या दरम्यान अशा भयंकर भावना आहेत. माझ्या आईच्या हल्लेखोराचा शोध सुरू आहे, जर तुम्ही या माणसाला पाहिले असेल तर ताबडतोब अधिकाऱ्यांशी संपर्क साधा!” अशी पोस्ट यॉर्कने लिहीली आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close