क्राइम

प्रसिद्ध व्यावसायिकाने गोळी झाडून पत्नीला केले ठार नंतर स्वतःही गोळी झाडून केली आत्महत्या 

Spread the love

ठाणे / नवप्रहार मीडिया

                बांधकाम व्यावसायिक दिलीप साळवी यांनी पत्नीवर गोळी झाडात तिची हत्या केली . त्यानंतर स्वतःवर त्याच रिव्हॉल्वर मधून गोळी झाडून घेत आत्महत्या केली. या घटनेने ठाणे हादरले आहे. दिलीप साळवी हे माजी महापौर गणेश साळवी यांचे मोठे बंधू होते.

दिलीप साळवी यांनी पत्नी प्रमिला साळवी हिच्यावर गोळी झाडून तिचा खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली .  पत्नीच्या खूनानंतर दिलीप यांनी स्वतःवरही आपल्याच परवानाधारक रि्व्हॉल्वरमधून गोळी झाडून आत्महत्या केली. खुनाचे हे थरारनाट्य कळव्यातील मनीषानगरातील कुंभारआळीतील साळवी यांच्या घरात घडले.

या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.घटनास्थळी ठाण्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त महेश पाटील, उपायुक्त गणेश गावडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात आदीचे पथक दाखल झाले आहे. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविण्यात आल्याचे कळवा पोलिसांनी सांगितले. हत्या आणि आत्महत्येचे नेमकी कारण अजून समजू शकले नसून जागेचा आणि घटनेचा पंचनामा सुरु असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close