सामाजिक
वीज पडून मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला आ. प्रताप अडसड यांनी मिळवून दिली शासकीय मदत
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
गोपाल मनोहर करपते राहणार मलातपुर तालुका धामणगाव रेल्वे यांचा एप्रिल महिन्यात वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. करपते कुटुंबातील करता पुरुष निघून गेल्याने करपते कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर ओढला त्यावेळी आमदार प्रतापदादा अडसड यांनी तातडीने शासकीय मदत करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना निर्देशित केले होते. त्याच अनुषंगाने आज आमदार प्रतापदादा अडसड यांच्या हस्ते चार लक्ष रुपयाचा धनादेश करपते कुटुंबीयांना आमदार प्रतापदादा अडसड यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य नलूभाऊ रामावत, मनोजभाऊ डहाके, बबलूभाऊ बिरे, अतुलभाऊ काळे, रवीभाऊ जिचकार, बंडूभाऊ ढोबळे, समीरभाऊ खेडकर, प्रमोद भाऊ परतेकी, स्वप्नीलभाऊ रोंघे, मेश्राम भाऊ उपस्थित होते.*
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1