हटके

कुटुंबीय उपाशी तर प्रेयस्या तुपाशी ; वाघमारे च्या अंगावरील दागिने नकली 

Spread the love

वरळी / नवप्रहार डेस्क

                    स्पा सेंटर मध्ये झालेल्या गुरू सिधप्पा वाघमारे यांच्या खुना नंतर अनेक रहस्या वरून पडदा उठत आहे. वाघमारे याला पत्नी आणि मुलगा होता. पण तो त्यांना कुठलाही खर्च देत नव्हता तर आपली कमाई प्रेयसींवर उडवत होता अशी धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. शिवाय महिलांना आकर्षित करण्यासाठी तो जे सोने घालत होता ते देखील नकली होते.

वरळीतल्या सॉफ्ट टच स्पामध्ये रक्ताच्या थारोळ्यात वाघमारेचा मृतदेह सापडला होता. जेव्हा वाघमारे मेला तेव्हा त्याच्या अंगावर मोठ्या प्रमाणात सोनं होतं. पण जेव्हा खोलवर तपास केला तेव्हा हे सोनं खोटं असल्याचं समोर आलं.

एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या माहितीनुसार 2017 पासून वाघमारे हे खोटे दागिने घालत होता. दादरमधल्या एका दागिन्यांच्या दुकानातून वाघमारेने हे दागिने विकत घेतले होते. हे दागिने आगदी खऱ्या दागिन्यासारखे वाटायचे. वाघमारेच्या अनेक प्रेयसी होत्या. त्यांना इम्प्रेस करण्यासाठी वाघमारे हे दागिने घालायचा वाघमारे जे काही पैसे कमवायचा तो आपल्या प्रेयसींवर खर्च करायचा.

ज्या भागात वाघमारे रहायचा तिथल्या लोकांसाठी वाघमारे हिरो होता. अंगावरचे दागिने आणि त्याच्या लाईफस्टाईलवरून तो खुप श्रीमंत असेल असे लोकांना वाटाचये. वाघमारे हा पोलिसांचा खबऱ्या म्हणून काम करायचा आणि खंडणीखोर म्हणून लोकांकडून पैसे उकळायचा.

वाघमारेने नुकतीच एक कार विकत घेतली होती. या गाडीचे तो महिन्याला 22 हजार रुपये हफ्ता भरायचा. वाघमारेचे अनेक बँकांमध्ये खाती होती, पण या खात्यांमध्ये काहीच पैसे नसल्याचे कळाले.

आपले वडिल घरी एकही पैसा देत नव्हते, जे काही पैसे ते कमावत ते त्यांच्या प्रेयसींवर खर्च करायचे अशी माहिती वाघमारेचा मुलगा रोहिदास वाघमारे याने दिली. घर चालवण्यासाठी रोहिदासने आपली बाईक विकली, तो सध्या बेरोजगार आहे. वडिल गेल्यानंतर मोठं कर्ज बाकी आहे असेही रोहिदासने म्हटलंय.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close