क्राइम

नकली नोटा बनवनाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Spread the love
लाखाच्या असली नोटांच्या बदल्यात तो द्यायचा तीन लाखांच्या नकली नोटा
आरोपी ठाकरे गटाचा पदाधिकारी 
कोल्हापूर / नवप्रहार मीडिया
              एका लाखाच्या नोटांच्या बदल्यात तीन लाखांच्या नकली नोटा देणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी त्याच्या साथीदारांसह मुसक्या आवळल्या आहेत. एलसीबी ला याची माहिती होताच पोलीसांनी योजनाबद्ध कारवाई करून त्याला अटक केली आहे.  या टोळीचा मुख्य सूत्रधार हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचा तालुकाप्रमुखच असल्याचे समोर आली आहे.

नोटा छापून देण्याचे आमिष दाखवून लोकांना गंडा घातला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी तपास करत आंतरराज्यीय रॅकेटवर कारवाई केली आहे.

याप्रकरणी या टोळीचा सूत्रधार अशोक बापू पाटील (वय ५१, रा. बेलवळे खुर्द, ता. कागल) याच्यासह मेहरूम अल्ताफ सरकवास (वय ४१) आणि सलील रफिक सय्यद (वय ३०, दोघे रा. घटप्रभा, जि. बेळगाव, कर्नाटक) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपीकडून एक लाखाची रोकड आणि नोटा छपाईचे साहित्य असा दीड लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. तसेच तिघांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

दरम्यान पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक पाटील हा शिवसेना ठाकरे गटाचा कागल तालुका अध्यक्ष आहे. संशयित अशोक पाटील हा कर्जबाजारी आणि आर्थिक गरजवंतांना हेरुन कर्नाटकातील साथीदारांच्या मदतीने तिप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना मिळाली होती. पोलीस अधीक्षक पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला या गुन्ह्याचा छडा लावण्याचे आदेश दिले

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close